Dada Bhuse : मालेगाव महापालिकेला 500 कोटी; दादा भुसे

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal

मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत अभियान टप्पा क्रमांक दोनमधील भुयारी गटार योजनेच्या कामासाठी ५०० कोटी रुपयांच्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. ही माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी कळविली आहे. योजनेच्या कामातून भुयारी गटारीचा प्रश्‍न मार्गी लागल्यास येथे घरगुती मलनिस्सारण जोडणी व सांडपाणी संकलन व्यवस्था ही कामे व पावसाळ्यातील साचणाऱ्या पाण्याचा प्रश्‍नही निकाली निघू शकेल.


केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत मालेगाव शहर भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यास यापूर्वी ९८ कोटी ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. या योजनेअंतर्गत शहरातील मोसम नदीमध्ये विसर्ग होणारे सांडपाणी ट्रंकमेनद्वारे व पंपिंग स्टेशनद्वारे पंपिंग करून मलनिस्सारण केंद्र उभारून तेथे प्रक्रिया व शुद्ध करून नदीमध्ये सोडणे या कामाचा समावेश आहे. टप्पा क्रं.१ मध्ये केवळ मोसम नदीमध्ये येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणे या बाबीचा समावेश आहे. घरगुती मलनिस्सारण जोडणी व सांडपाणी संकलन व्यवस्था ही कामे टप्पा क्रमांक २ मध्ये समाविष्ट आहेत.


महाराष्ट्र शासनाच्या जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांच्याकडून मालेगाव महापालिकेच्या केंद्र शासन व राज्य शासन अनुदानित महाअभियान अमृत टप्पा क्रमांक-२ अंतर्गत शहरातील मलनि:सरण प्रकल्प करण्यात येणार आहे. याद्वारे शहरातील सांडपाण्याची व्यवस्था करण्यात येईल. शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. शहरातील गटारीचे पाणी अर्थात सांडपाणी मौसम नदीत विसर्ग न करता पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून संरक्षण होणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. शहरात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. जीर्ण झालेल्या गटारी तुडुंब भरून रस्त्यावर पाणी येते. भुयारी गटारीचा प्रश्‍न निकाली निघाल्यास पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होवू शकेल. सदर महत्वाकांक्षा योजनेच्या मंजुरीसाठी पालकमंत्री श्री. भुसे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com