Nashik News : हतबल पोलिसही अन् पालकमंत्रीही! फक्त पुन्हा-पुन्हा अल्टिमेटम

Nashik News : हतबल पोलिसही अन् पालकमंत्रीही! फक्त पुन्हा-पुन्हा अल्टिमेटम

Nashik News : उशिराने का होईना जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती, त्या वेळीही शहरातील रस्त्यासह मुंबई - आग्रा महामार्गांवर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली होती. तेव्हाही पालकमंत्र्यांनी आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता. नाशिक रोड परिसरात दोन- तीन महिन्यांपूर्वी गुन्हेगारीने डोके वर काढले होते.

एकापाठोपाठ वाहने फोडण्याचे प्रकार घडले असता, त्या वेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जात पाहणी केली. तेव्हाही शहरातील गुन्हेगारीचे ब्लॅक स्पॉट हेरून आठवडाभरात पोलिसांना कारवाईचा अल्टिमेटम दिला.

तर, ड्रग्ज‌च्या विळख्यात तरुण नाशिककर सापडला असताना, पालकमंत्री म्हणून दादाजी भुसे यांनी आक्रमकपणे ड्रग्ज‌विरोधात भूमिका मांडण्याऐवजी पोलिसांनी पुन्हा आठवडाभराचा अल्टिमेटम दिला. (dada bhuse gave one week ultimatum to police in drug case nashik news )

मात्र, सोईस्करपणे यापूर्वीच्या अल्टिमेटममधून साध्य काय झाले, याचा मात्र पालकमंत्र्यांना विसर पडला असावा. अन्यथा, या वेळी अल्टिमेटम देण्याऐवजी धडधडीत पुरावे असतानाही पोलिसांना पुन्हा आठवडाभराचे ‘जीवदान’ देत पालकमंत्र्यांनी जणू पोलिसांना अभयच दिल्याचे बोलले जाते आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता. १७) शहर-जिल्ह्याचे प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अमलीपदार्थांसंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी शिंदे गावातील एमडी ड्रग्ज‌चा कारखानाच उद्‌ध्वस्त केल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस यंत्रणेला धारेवर धरत गंभीर आरोप केले.

या आरोपांना पोलिसांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. मात्र, पालकमंत्री भुसे यांनी पोलिस यंत्रणेला कारवाई करण्याच्या केवळ सूचना केल्याने पोलिसांना अभय का, असा सवाल अनेकांना पडला. एमडी ड्रग्ज प्रकरणामुळे नाशिकच्या पावन छबीला गालबोट लागले आहे. त्यातही लोकप्रतिनिधींनी पुराव्यासह बैठकीत पोलिसांवर थेट आरोप केले.

Nashik News : हतबल पोलिसही अन् पालकमंत्रीही! फक्त पुन्हा-पुन्हा अल्टिमेटम
Protest News : राज्यातील 74 हजार आशा व गटप्रवर्तक आजपासून संपावर; चर्चा निष्फळ

नाशिक रोड पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावरील शिंदेगावात ३०० कोटींचा एमडी ड्रग्ज‌चा साठा मुंबईच्या साकीनाका पोलिसांकडून पकडला जातो. मात्र त्याची खबर नाशिक पोलिसांना नसावी, यावर खरे म्हणजे कोणाचाही विश्वास बसणार नाही.

असे असताना, पालकमंत्र्यांकडून मात्र याबाबत जाबदेखील पोलिस यंत्रणेला विचारण्यात आला नाही, की इतक्या गंभीर प्रकारात पोलिस प्रमुखांना आपल्या यंत्रणेतील पोलिसांविरुद्ध कोणती कारवाई केली याचीही विचारणा करू नये, याचे आश्चर्य बैठकीला उपस्थित असणाऱ्यांना वाटले. एकीकडे पोलिस यंत्रणा एमडी ड्रग्ज‌ प्रकरणात हतबल असल्याचे दिसून आलेले असताना दुसरीकडे, पालकमंत्री पोलिस यंत्रणेसमोर हतबल झाले आहेत का, असा साधा प्रश्न पडावा अशीच भूमिका पालकमंत्र्यांची दिसून आली.

बदल काहीच नाही...

यापूर्वी दिलेल्या अल्टिमेटम संपल्यानंतरही कोणताही बदल नाशिककरांना दिसून आला नाही, हे वास्तव आहे. तरीही पालकमंत्री मात्र अल्टिमेटम देत पोलिस यंत्रणेवर कठोरपणे कारवाई न करता ‘अभय’ देत आहे, त्यावरून पोलिसांप्रमाणेच तेही ‘हतबल’ तर नाहीत ना, की ‘अल्टिमेटम’प्रमाणे, तेच आपण पालकमंत्री आहोत याचा त्यांनाच विसर पडल्याने मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा दरवाजा खटखटावा लागतो आहे.

Nashik News : हतबल पोलिसही अन् पालकमंत्रीही! फक्त पुन्हा-पुन्हा अल्टिमेटम
Nashik Drug Case : पाटील यांच्या अवैध कंपनीबाबत चौकशी सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com