esakal | लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

pinya crime 1.png

मृत तरुणाने मुलीबरोबर गैरवर्तन करत पळ काढल्याने त्याला पकडण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीधारकाकडून लिफ्ट घेतली होती.  माडसांगवी येथील गुराखी हिरालाल प्रजापती यांचा सोमवारी (ता. २८) मध्यरात्री दहीपूल परिसरात खून झाला होता. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर लाकडी दंडुक्याने वार केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला आहे.

लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : मृत तरुणाने मुलीबरोबर गैरवर्तन करत पळ काढल्याने त्याला पकडण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीधारकाकडून लिफ्ट घेतली होती.  माडसांगवी येथील गुराखी हिरालाल प्रजापती यांचा सोमवारी (ता. २८) मध्यरात्री दहीपूल परिसरात खून झाला होता.  त्या प्रकरणात आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला आहे.

दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

गुराखी हिरालाल प्रजापती यांचा सोमवारी (ता. २८) मध्यरात्री दहीपूल परिसरात खून झाला होता. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर लाकडी दंडुक्याने वार केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सराफ बाजाराच्या दिशेने संशयित पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. परिसरातील नागरिकांशी चर्चा केली. तरी देखील ठोस माहिती मिळू शकली नाही. शहर गुन्हे शाखा पथक एक आरोपीच्या शोधात होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने सराफ बाजार परिसराची पाहणी करत तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्याआधारे त्यानी तपास करत असताना मुख्य संशयित पिनेश ऊर्फ पिन्या रमेश खरे हा पंचवटी हद्दीतील गंगागोदावरी भागात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गुरुवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास त्यास दुतोंड्या मारुती परिसरातून अटक केली.

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

लिफ्ट देणे आले अंगाशी 
मृताने मुलीबरोबर गैरवर्तन करत पळ काढल्याने त्याला पकडण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीधारकाकडून लिफ्ट घेतली होती. त्यानंतर रागाच्या भरात संशयिताने मृतास लाकडी दंडुक्याने मारहाण केली. त्याचे हातपाय तोडण्याचा विचार होता. परंतु मारहाणीत त्याच्या डोक्यास मार लागल्याने तो मृत झाल्याचे माहिती पोलिस तपासात पुढे आली.  

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली

पोलिस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी गुन्हे शोध पथकाने संशयितास भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी (ता. २) त्यास न्यायालयात हजर केले असता, त्यास सोमवार (ता. ५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. भद्रकाली पोलिसांत दाखल असलेल्या तक्रारीत दोन संशयित असल्याचे नमूद आहे. संशयिताने मात्र तो एकटाच असल्याचे सांगितले. पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. हिरालाल प्रजापती खून प्रकरणातील संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली. पिनेश ऊर्फ पिन्या रमेश खरे (वय २७, रा. सांमोडे, साक्री, पिंपळनेर) संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

loading image