Dairy Business Crisis: दुग्ध उत्पादन 20 टक्क्यांनी घटले! चारा अन पाणी टंचाई, उन्हाचा तडाखा, पशुखाद्याच्या वाढत्या दराचा परिणाम

Nashik News : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेला दुग्ध व्यवसाय दुष्काळाच्या झळा आणि उन्हाच्या वाढत्या तडाख्याने अडचणीत येऊ पाहत आहे.
Dairy Business Cows
Dairy Business Cowsesakal

वावी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेला दुग्ध व्यवसाय दुष्काळाच्या झळा आणि उन्हाच्या वाढत्या तडाख्याने अडचणीत येऊ पाहत आहे. गेल्या हंगामात पावसाने सर्वच ठिकाणी पाठ फिरवल्यामुळे निर्माण झालेली चारा व पाणी टंचाई, पशुखाद्याच्या वाढत्या किमती यामुळे पशुधन सांभाळण्याची कसरत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना करावी लागत आहे. यातच वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादनात अंदाजे वीस टक्के घट झाली आहे. (Dairy Business Crisis Milk production decreased marathi news)

मागील वर्षी वरूण राजा रुसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कळीत झाले. शेतीचे उत्पन्न नाही, पशुधनास जगवण्यासाठी चारा विकत घेण्याची वेळ बळीराजावर ओढवली. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, चारा व पाण्याची टंचाई यामुळे आश्वासक असणारा दुग्ध व्यवसाय दुधाच्या घसरत्या दरामुळे परवडेनासा झाला आहे.

दुष्काळी परिस्थितीत दुग्ध व्यवसाय भरभराटीला आणणाऱ्या सिन्नर तालुक्यात फेब्रुवारीपासून सरासरी दूध उत्पादनात २० टक्के घट आलो आहे. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल होईपर्यंत म्हणजे येत्या ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. (latest marathi news)

Dairy Business Cows
Nashik Water Crisis: तलाव आटल्याने येवलेकरांना 5 दिवसाआड पाणी! शहरात गढूळ पाणीपुरवठा, पाणीबाणीची स्थितीमुळे आवर्तनावर भिस्त

पाणी, चारा विकत घेण्याची शेतकऱ्यावर वेळ

चारा व पाणी विकत घेऊन जनावरांचे पालन करावे लागत आहे. हिरवा चारा दुरापास्त झाला असून पशुखाद्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे बहुसंख्य दुग्ध उत्पादक शेतकरी फक्त जनावरे जगवण्याला प्राधान्य देत आहेत. दूध दरात सातत्याने होणारी घसरण देखील दुग्ध उत्पादन घटविण्यास कारणीभूत ठरली आहे.

सिन्नर तालुक्याचे प्रतिदिन दूध संकलन सुमारे सहा लाख लिटर इतके आहे. त्यात सुमारे सव्वा लाख लिटर प्रतिदिन घट झाली आहे. शेतकऱ्यांना गेले संपूर्ण वर्ष पाणी व चारा विकत घ्यावा लागतोय. दुधाच्या घसरलेल्या दरामुळे आणखी आर्थिक फटका बसतो आहे.

यंदा पावसाने अनुकूल साथ दिली तरच ऑगस्टनंतर टंचाई संपेल. गेल्या वर्षी फेब्रुवारी तेराशे रुपयांना मिळणारे पशुखाद्य पोते आता एक हजार सातशे रुपयांना विकत घ्यावे लागते. बाहेरील जिल्ह्यातून अधिकचा पैसा मोजून चारा उपलब्ध करून घ्यावा लागतो आहे.

"दुधाचे घसरते दर आणि घटते उत्पादन या परिस्थितीत सिन्नर मधील शेतकऱ्यांना शासनाकडून घोषित प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळण्याला देखील अडचणी येत आहेत. २०२० च्या पशुगणना अहवालात बहुसंख्य शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांची नोंदच नाही. शासनाच्या पोर्टलवर नव्याने माहिती अपडेट करताना फार्मर आयडी व जनावरांचा टॅग मॅच होत नाही. सद्याच्या प्रतिकूल परिस्थितीत या प्रतीचे दूध उत्पादित होत नसल्यामुळे सिन्नर मधील मोठ्या संख्येने शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहतील."

- श्रीकृष्ण घुमरे, संचालक, सिन्नर बाजार समिती

Dairy Business Cows
Poultry Business Crisis: कुक्कुटपालन व्यवसायाला दुष्काळाची झळ! पिलांसह खाद्याचे भाव वाढले; तीव्र उन्हामुळे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com