दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस; द्राक्षबागा, कांदा पिकाचे नुकसान

rains in dindori taluka
rains in dindori talukaSakal

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यात रविवारी (ता.३०) सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पावसाने द्राक्षबागांच्या काड्या मोडल्या असून, कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे. (damage to onion crop including vineyards due to torrential rains in dindori taluka)

रविवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. पावसाचे कुठल्याही प्रकारचे चिन्ह दिसत नव्हते. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरवात झाली. या काळात वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. द्राक्षबागेतील काड्या मोडल्या असून, उघड्यावर ठेवलेल्या उन्हाळ कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्व भागात शिंदवड, खेडगाव, तिसगाव, बोपेगाव, मोहाडी, जानोरी परिसरात झाडे रस्त्यावर पडली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नद्या-नाल्यांमधून पाणी वाहत होते, तर वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता.

rains in dindori taluka
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे वेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com