जिद्दीला सॅल्यूट! घरात एकवेळ खाण्याची भ्रांत...मात्र लेकीने केलं संधीचं सोनं...आई बापाला आनंदाश्रू अनावर

aarti.jpg
aarti.jpg
Updated on

नाशिक : घरची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि समोर शिक्षणाची मोठी समस्या. आई धुणी - भांडी तर वडील बंगल्यावर काम करतात. घरात लहान बहीण, भाऊ त्यांची संपूर्ण जबाबदारी आरतीची. पण तरीही तिचा इरादा मात्र पक्का...

आरतीला व्हायचंय अधिकारी

घरात अठरा विश्व दारिद्र्य आई धुणी - भांडी तर वडील बंगल्यावर काम करतात. घरात लहान बहीण, भाऊ त्यांची संपूर्ण जबाबदारी आरतीची. गंगापूर रोड येथे दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे गांडगे कुटुंबीय स्वतः अशिक्षित असल्याने मुलीला उच्चशिक्षित करण्याचे ध्येय उराशी बाळगून दिवसभर बंगल्यामध्ये काम करतात. आरती घरात मोठी असल्याने घरातील सर्व काम आवरून लहान बहीण भावाचा सांभाळ करून शाळेत जात असे. त्यानंतर शिकवणीला व पुन्हा घरातले काम असा नित्य दिनक्रम. आरती अतिशय हुशार व जिद्दी असल्याने खडतर परिस्थितीशी दोन हात करत दहावीच्या परिक्षेत ८४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. 

आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

आई वडील सकाळी नऊ वाजेपासून कामासाठी घराबाहेर पडतात. सर्व कामे उरकून रात्री नऊ वाजता घरात येतात. तोपर्यंत सर्व भूमिका आरतीला पार पाडावी लागत असे. आरती हिने पहाटे अभ्यास करून यश प्राप्त केल्याने आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू ओघळून आले होते. घरात एकवेळ खाण्याची भ्रांत असणाऱ्या आरतीचे यश पाहून परिसरातील सर्वांनीच तिचे कौतुक केले. यासाठी तिला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळल्यानेच तीने यशाला गवसणी घातली.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
Yeola government clerk bribery news
Farmer’s Daughter Achieves CA Dream, Honors Late Father’s Wish
Suitcase Murder Case Cracked: Police Reveal Motive Behind Lover’s Killing
Marathi News Esakal
www.esakal.com