Nashik Crime New : ...अन दुर्दैवी ‘ती'ला मिळाले दहावीत 57 टक्के | dead minor girl secured 57 percent marks in 10th nashik crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime New : ...अन दुर्दैवी ‘ती'ला मिळाले दहावीत 57 टक्के

Nashik News : इंदिरानगर परिसरात बुधवारी (ता. ३१) पाच मजली इमारतीच्या टेरेसवरून धक्का देत खाली पाडलेल्या आणि गुरुवारी (ता. 1) दुपारी दुर्दैवाने निधन झालेल्या विद्या हनुमान काळे (१६) या अल्पवयीन मुलीला आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ५७ टक्के गुण मिळाले. (dead minor girl secured 57 percent marks in 10th nashik crime news)

मात्र हा निकाल बघण्यासाठी ती नसल्याने तिच्या कुटुंबीयांसह शाळेतील शिक्षक आणि वर्गातील मित्र- मैत्रिणींनी हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, इंदिरानगर पोलिसांनी या खून प्रकरणी विनायक सुरेश जाधव याला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून, अजून एकाचा पोलीस शोध घेत आहेत. इंदिरानगरच्या कैलासनगर भागात राहणारे मूळचे परभणी येथील पीडितेचे वडील हनुमान काळे पत्नी सविता यांच्यासोबत भाजीपाला घेण्यासाठी लेखानगर येथे गेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर भाऊ ओम ओझर येथे गेला होता. आठच्या सुमारास ते परत आल्यानंतर घराच्या अंगणात अगदी त्यांच्या पुढ्यात ही बालिका धाडकन पडली. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. मृत्युपूर्वी आईवडिलांना तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

तिने एका ओळखीच्या मुलाचा उल्लेख केला होता. त्या अंगाने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे आणि सहकार्यांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.