Nashik : खड्डे खोदण्यासाठी आता 30 एप्रिलपर्यंतच मुदत

NMC Nashik news
NMC Nashik newsesakal

नाशिक : शहरात नव्याने रस्ते तयार केले जातात, मात्र विविध कारणांसाठी पुन्हा रस्त्यांची तोडफोड होते. त्यातही विशेष बाब अशी की, मेपर्यंत खोदलेले खड्डे पुन्हा पूर्ववत होत नाही. परिणामी पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून जीवितहानी होते. हा प्रकार बंद करण्याच्या उद्देशाने खड्डे खोदण्यासाठी आता ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (deadline for digging pits is now till 30th April Nashik Latest Marathi News)

महापालिकेकडून दरवर्षी शहरात नवीन रस्ते तयार केले जातात. रस्ते तयार केल्यानंतर विविध प्रकारच्या केबल्स, ड्रेनेज, पिण्याची पाइपलाइन आदींसाठी तेच रस्ते पुन्हा खोदले जातात. रस्ते खोदाई करताना बांधकाम विभागाकडे ठराविक शुल्क आता केले जात असले तरी त्याचा फायदा तर होत नाही.

त्याशिवाय नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. खड्डे खोदण्यासाठी यापूर्वी मेअखेरपर्यंत मुदत होती. जेणेकरून पावसाळा सुरू झाल्यानंतर कामे बंद राहतील. परंतु, मे महिन्यात खोदून ठेवण्यात आलेले रस्ते पुन्हा बुजविले न गेल्याने पावसाचे पाणी साचून त्यातून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व भारत दूरसंचार निगम लिमिटेड कंपनीकडून खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याशिवाय महापालिकेची प्रतिमादेखील मलिन झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आता रस्ते खोदण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत परवानगी दिली आहे. त्यानंतर कामे बंद करून पावसाळ्यानंतरच कामे करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

NMC Nashik news
Nashik : ‘वात्सल्य वृद्धाश्रमा’च्या नावाखाली परप्रांतीयांकडून देणगीचे संकलन

रस्ते दुरुस्ती तपासणार

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड व भारत संचार निगमकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. गॅस कंपनीने तर जवळपास २०५ किलोमीटरची खोदाई केली आहे. खोदाईपोटी महापालिकेकडे तोडफोड शुल्कदेखील अदा करण्यात आले. मात्र, शुल्क अदा केल्यानंतरही संबंधितांची जबाबदारी संपुष्टात आली असा एक अर्थ काढला जात आहे.

मात्र, रस्त्याची खोदाई झाल्यानंतर खोदाई झालेली जागा पूर्ववत करण्याचीदेखील जबाबदारी खोदाई करणाऱ्यांची आहे. त्यामुळे आता खोदाई करण्यात आलेली जागा पूर्ववत केली की नाही, याची तपासणी बांधकाम विभागाकडून करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

NMC Nashik news
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com