नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गिरीश महाजन

Rural Development Minister Girish Mahajan during the actual inspection of dams burst due to cloudburst and damage to farmers.
Rural Development Minister Girish Mahajan during the actual inspection of dams burst due to cloudburst and damage to farmers.esakal

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गुरुवारी (ता. १) रात्री अकराला जोरदार ढगफुटीमुळे अडसरे फळवीरवाडी परिसरात मोठे नुकसान झाले. ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता. ४) अडसरे फळवीरवाडी येथील बंधाऱ्याची घटनास्थळी जाऊन स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत परिसरातील नुकसानीची पाहणी केली. (Girish Mahajan orders on rainy season crop damage Nashik Latest Marathi News)

पुरात शेकडो हेक्टर जमिनींचे मोठे नुकसान झाले. अनेकांची शेती, रस्ते वाहून गेले, शेताचे बांध फुटले, विहिरी जमीनदोस्त झाल्या, मोटारी, पाइपलाइनसह झाडांसह पिकांची मोठे नुकसान झाले. काही तासांत होत्याचे नव्हते झाले. पाझर तलाव अचानक फुटला. बंधाऱ्याच्या वरील म्हैसवळण घाटरस्ता पूर्ण खचला, मोठमोठ्या दरडी कोसळल्या, परिसरात पुरामुळे हाहाकार उडाला.

वीज नसल्याने सर्वत्र अंधार आणि पुराचे साम्राज्य व जोरदार पाऊस या परिस्थितीत इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सर्वतोपरी प्रयत्न करत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बचावकार्य केले व बंधाऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकरी, ग्रामस्थांची सुखरूप सुटका करत प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, या परिसरातील नुकसान पाहता तत्काळ फुटलेला बंधारा दुरुस्ती करण्यात यावा जेणेकरून या भागातील पाणीप्रश्न मार्गी लागेल, लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शासनस्तरावर नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.

Rural Development Minister Girish Mahajan during the actual inspection of dams burst due to cloudburst and damage to farmers.
कलाशिक्षक दत्ताजी राठोडांनी ‘I Pad’ने साकारले गणेश

पाहणी दौऱ्यात नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह लघुपाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक खेडकर, स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक आदींसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देऊन त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, म्हैसवळण घाटरस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा, कृषिपंढरी अथवा कोणतीही शासकीय योजना लागू होत असेल ती योजना राबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी दुरुस्ती करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी दत्तू चौरे, मनोहर चौरे, किरण साबळे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, तालुका संघटन सरचिटणीस तानाजी जाधव, सागर साबळे, सरचिटणीस संजय झनकर, ओबीसी आघाडी तालुका सरचिटणीस भरत रायकर, सरपंच सतू साबळे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ नेते अशोक महाले, आमदार राहुल ढिकले आदींसह शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते.

"ढगफुटीमुळे फुटलेला बंधारा लवकरच दुरुस्त केला जाईल, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत." -गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य

Rural Development Minister Girish Mahajan during the actual inspection of dams burst due to cloudburst and damage to farmers.
Nashik : ‘वात्सल्य वृद्धाश्रमा’च्या नावाखाली परप्रांतीयांकडून देणगीचे संकलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com