NEET Admission : ‘नीट’च्या नोंदणीची 9 मार्चपर्यंत मुदत; वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लिटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) २०२४ परीक्षेच्‍या नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
NEET Admission
NEET Admissionesakal

NEET Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लिटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) २०२४ परीक्षेच्‍या नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

पात्रताधारक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने ९ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. तर ५ मेस राष्ट्रीय स्‍तरावर परीक्षा होणार आहे. (deadline for NEET registration is 9 March nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांना ‘नीट’ परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. काही दिवसांपासून विद्यार्थी, पालकांना नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, नोंदणीला सुरवात झाली आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ९ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. ‘नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी’ (एनटीए) यांच्‍यातर्फे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या अभ्यासक्रमांना ‘नीट’द्वारे प्रवेश

एमबीबीएस, बीडीएस (दंतशास्त्र), बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी), बीयूएमएस (युनानी), फिजिओथेरपी, स्‍पीच थेरपी यांसह बी. एस्सी (नर्सिंग) या अभ्यासक्रमांना ‘नीट’ परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिले जातील.

NEET Admission
NTA : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी JEE, NEET, NET सह इतर परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा वेळापत्रक

दोन सत्रांमध्ये दोनशे प्रश्‍न

या परीक्षेत एकूण दोनशे वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍न विचारले जाणार आहेत. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र) या प्रत्‍येक विषयांवर आधारित ५० प्रश्‍न असतील. प्रत्‍येक विषयातील प्रश्‍नांची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटांमध्ये विभागणी केलेली असेल. दोनशे प्रश्‍न सोडविण्यासाठी तीन तास २० मिनिटांचा वेळ असेल.

मराठीसह प्रादेशिक भाषांचे पर्याय उपलब्‍ध

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ‘नीट’ परीक्षा वेगवेगळ्या १३ प्रादेशिक भाषांमध्ये देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असेल. यामध्ये इंग्रजी, मराठीसोबत हिंदी, गुजराथी, पंजाबी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, तमीळ, तेलगू, ऊर्दू या भाषांमधून परीक्षा देता येईल.

‘नीट’बाबत महत्त्वाच्‍या तारखा

* ऑनलाइन अर्ज, शुल्‍क भरण्याची अंतिम मुदत : ९ मार्च

* ‘नीट’ परीक्षेची तारीख : ५ मे

* निकालाची संभाव्‍य तारीख : १४ जून

NEET Admission
NEET PG 2024 परीक्षा अखेर पुढे ढकलली; NBEची अधिकृत घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com