एमबीए, एमसीए प्रवेशाच्‍या नोंदणीची २० पर्यंत मुदत | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 एमबीए, एमसीए प्रवेशाच्‍या नोंदणीची २० पर्यंत मुदत

नाशिक : एमबीए, एमसीए प्रवेशाच्‍या नोंदणीची २० पर्यंत मुदत

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : सीईटी सेलने पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या एमबीए आणि एमसीए यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्‍यानुसार सीईटी दिलेल्‍या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २० नोव्‍हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करायची आहे. महिन्‍याअखेरपासून कॅप राउंडची प्रत्‍यक्ष प्रक्रिया पार पडेल.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा होती. वेळापत्रक जाहीर झाल्‍याने अखेर ही प्रतीक्षा संपली असून, प्रवेशप्रक्रियेला गती मिळाली आहे. या वेळापत्रकानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना २० नोव्‍हेंबरच्‍या सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. स्क्रुटिनी पद्धतीद्वारे कागदपत्रे पडताळणी व प्रवेश अर्ज भरण्यासाठी २१ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

हेही वाचा: एसटी कामगारांचा कुटुंबीयांसह गेवराई तहसीलवर मोर्चा

प्रवेशप्रक्रियेच्‍या अधिकृत वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सीईटी सेलच्‍या संकेतस्‍थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. दरम्‍यान, एमबीए व एमसीए यांच्‍या ऑनलाइन अर्जाची मुदत सारखी असली, तरी वेळपत्रकात किरकोळ बदल आहेत.

असे आहे एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक...

ऑनलाइन नोंदणीची मुदत - २० नोव्‍हेंबरपर्यंत

कागदपत्र पडताळणी, प्रवेश अर्ज भरणे - २१ नोव्‍हेंबरपर्यंत

प्रारूप गुणवत्तायादीची प्रसिद्धी - २२ नोव्‍हेंबर

यादीसंदर्भात तक्रार, हरकतीची मुदत - २३ ते २५ नोव्‍हेंबर

अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्धी - २६ नोव्‍हेंबर

पहिल्‍या कॅप राउंडची नोंदणी मुदत - २७ ते २९ नोव्‍हेंबर

पहिल्‍या कॅप राउंडची निवड यादी - २ डिसेंबर

प्रवेशनिश्‍चिती प्रक्रियेची मुदत - ३ ते ५ डिसेंबर

loading image
go to top