पाण्यासाठी शेतकरी व पाणीवापर संस्थांना 19 ऑगस्टपर्यंत मुदत

Irrigation latest marathi news
Irrigation latest marathi newsesakal

नाशिक : पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, चांदवड, सिन्नर व दिंडोरी तालुक्यातील ३१ लघु प्रकल्पातील व १० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ३३ टक्के पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगाम २०२२-२३ करिता पिकांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी शेतकरी व पाणी वापर संस्थांनी पाण्याचा लाभ घेण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंत आपले अर्ज सिंचन शाखा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी केले. (Deadline till August 19 for farmers and water use organizations for water nashik latest marathi news)

चालूवर्षी धरणात व लघु तलावांमध्ये जसजसा पाऊस पडून नवीन पाण्याचा साठा उपलब्ध होईल, त्या पाणीसाठ्याच्या अनुमानानुसार चालु खरीप हंगामातील विहिरीवरील पिके व पेरणी झालेली चारा पिके, अन्नधान्य, कडधान्य व तेलबियांची पिके यांना नमुना नंबर ७ च्या अटी व शर्तीच्या अधीन राहून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

सदर पाणीपुरवठा करताना शासन व वरिष्ठ कार्यालयाच्या निर्णयाप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Irrigation latest marathi news
अस्वच्छता करणाऱ्या डुकरांना आता थेट ठार मारण्याचा निर्णय

पाणी पुरवठा करताना पाऊस कमी झाल्यास किंवा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास अथवा आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासल्यास अशा वेळी दिलेले परवाने व मंजुरी रद्द करण्यात येईल.

तसेच प्रकल्पावर व कालव्यावर नमुना नंबर ७ नुसारचे मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात समप्रमाणात कपात करून मंजुरी देण्यात येईल. सहकारी पाणीवापर संस्थेच्या लाभक्षेत्रात नमुना नंबर ७ ची मंजुरी अनुज्ञेय राहणार नाही. काळ्या यादीतील व थकबाकी असणाऱ्या लाभार्थ्यांना मंजुरी दिली जाणार नाही.

तसेच कालव्यावरील मंजूर उपसा धारक व्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रीक मोटारी, ऑइल इंजिन ठेवून अथवा पाइप लाइनद्वारे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये, असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही केली जाईल.

ज्या शेतकऱ्यांना उपसा सिंचनाच्या कायमस्वरूपीच्या मंजुरीस मुदतवाढ दिली आहे, त्यांनी आपले नमुना नंबर ७ चे पाणी अर्ज भरून मागणी करणे आवश्यक आहे. ज्यांना पाण्याचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी सध्याचा वैध सातबारा उतारा जोडणे बंधनकारक राहील, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Irrigation latest marathi news
दारूसाठी पैसे न दिल्याने दाजीकडून मेव्हण्यास मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com