Nashik News : नासर्डी नदीत एका दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Nashik News : नासर्डी नदीत वाहुन आला अवघ्या एका दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह

सातपूर : स्वारबाबानगर तसेच औद्योगिक वसाहतीतील, राधाकृष्ण हॉटेलजवळ कांबळेवाडी परीसरातील नासर्डी नदीच्या पात्रात रविवारी (ता. ५) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका दिवसाच्या अर्भक वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला.

परीसरातील गौतम निकम, राजू पांडे, गणेश रोकडे यांनी हे अर्भक वाहून येत असल्याचे पाहिले असता, त्यांनी तत्काळ सातपूर पोलिस ठाण्याला माहिती कळवली.

पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, उपनिरीक्षक राजू पठाण आदी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, तसेच या मृत अर्भकाचा पंचनामा करीत तत्काळ मृत अर्भक हे जिल्हा रूग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविले. (Death body of one day old baby was washed away in river Nasardi Nashik News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

पोलिसांनी नागरिकांकडून अधिक माहिती घेत अशा घटनेविषयी जनजागृतीही केली. अर्भक पुरुष जातीचे असून अवघ्या एक दिवसाचे आहे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्याचा शोध घेवुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सातपूर पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक सतीश घोटेकर यांनी सांगितले.

घटनेची माहिती कळताच परीसरातील नागरिक तसेच महिलांनी हळहळ व्यक्त केली. अवघ्या एकाच दिवसाच्या मुलाचे अर्भक अज्ञात अमानुष आईने का नदीत फेकले असावे, या अगोदरही सातपूर शहरातील सर्वात मोठ्या गुडीपाढव्याच्या यात्रेतच एका जुन्या शाळेतील इमारतीत अर्भकाचा कुत्र्यांनी लचके तोडले होते, तसेच श्रमिकनगर, बजरंगनगर, महादेवनगर अशा अनेक ठिकाणी घटना घडतात. मात्र, पुढे तपास काही लागत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :NashikRiverDeath Bodies