esakal | लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?
sakal

बोलून बातमी शोधा

crime nashik2.jpeg

हे युगुल बुधवारी (ता.१३) दुपारी चेकआउट करणार होते. मात्र, सकाळी अकराला त्यांनी पुढे पुन्हा रूम कायम केली. तन्मयने त्याच्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. संध्याकाळी पाच वाजता तन्मय व अर्चनाचे आई, वडीलांसह अन्य नातेवाईक हॉटेलमध्ये अचानकपणे येऊन धडकले.

लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : ठाण्यातील बोईसर येथे राहणारी तरुणी आपल्या पालघरमध्ये राहणाऱ्या प्रियकरासोबत नाशिक येथे आली होती. शहरातील एका लॉजमध्ये एक दिवस मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक संध्याकाळी दोघांचेही आई-वडील लॉजमध्ये येऊन धडकले. अन् नंतर समजला प्रकार. समोरील घटना बघून सगळ्यांचाच उडाला थरकाप. असे काय घडले नेमके?

संपूर्ण नाशिक हादरले...

सीबीएसवरील एका हॉटेलच्या लॉजिंगमध्ये मंगळवारी (ता. 12) दुपारी संशयित प्रियकर तन्मय प्रवीण धानवा (२१,रा.मासवन, कोळीपाडा, पालघर) आणि अर्चना सुरेश भोईर (२०,रा. कल्लाले मान, बोईसर) हे युगल मुक्कामी आले होते. हे युगुल बुधवारी (ता.१३) दुपारी चेकआउट करणार होते. मात्र, सकाळी अकराला त्यांनी पुढे पुन्हा रूम कायम केली. तन्मयने त्याच्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. संध्याकाळी पाच वाजता तन्मय व अर्चनाचे आई, वडीलांसह अन्य नातेवाईक हॉटेलमध्ये अचानकपणे येऊन धडकले. यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य कामगारांनी दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक-२०३च्या दिशेने धाव घेतली. यावेळी खोलीतील पलंगावर अर्चना मृतावस्थेत आढळून आली व तन्मय येथील एका कोपऱ्यात बसलेला होता. याबाबत व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्चनाला तपासून बघितले असता ती मयत झाल्याची खात्री पटली. 

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

प्रियकर तन्मय यास अटक

यावेळी पोलिसांनी तिच्यासोबत थांबलेल्या तन्मयला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रथमदर्शनी अर्चनाचा तोंड दाबल्यामुळे मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रेयसीच्या खूनाच्या संशयावरुन संशयित प्रियकर तन्मय यास पोलिसांनी अटक केली आहे. मयत अर्चनाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

loading image