नाशिक- माहेश्वरी कांबळे हिच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हास्तर तज्ज्ञ चौकशी समितीने दिलेल्या अहवालात तिचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचे स्पष्ट नमूद केलेले असताना, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयाने (पीजी महाविद्यालय) त्यांच्या अहवालात माहेश्वरीची प्रकृतीच नाजूक असल्याने तिचा मृत्यू झाला असून, डॉक्टरांनी योग्य ते उपचार केल्याचे नमूद केले आहे.