esakal | मॉलवरून उडी मारण्याआधी 'त्याने' खिशात दोन-तीन चिठ्ठ्या ठेवल्या...त्यात होता धक्कादायक मजकूर!
sakal

बोलून बातमी शोधा

suicide letter.jpg

स्वप्नील सतीश मगरे (38, रा. सुदत्त अपार्टमेंट, पाटीलनगर, पेठे हायस्कूलजवळ, सिडको) यांनी गुरुवारी (ता.5) रात्री पावणेआठच्या सुमारास सिटी सेंटर मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. मॉलचे कर्मचारी संतोष निकम यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारादरम्यान रात्री उशिरा स्वप्नील मगरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत नोंद करण्यात आली.

मॉलवरून उडी मारण्याआधी 'त्याने' खिशात दोन-तीन चिठ्ठ्या ठेवल्या...त्यात होता धक्कादायक मजकूर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिटी सेंटर मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून गुरुवारी (ता. 5) रात्री पावणेआठच्या सुमारास उडी घेतलेल्या तरुणाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

रात्री उशिरा स्वप्नील मगरे यांचा मृत्यू
स्वप्नील सतीश मगरे (38, रा. सुदत्त अपार्टमेंट, पाटीलनगर, पेठे हायस्कूलजवळ, सिडको) यांनी गुरुवारी (ता.5) रात्री पावणेआठच्या सुमारास सिटी सेंटर मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. मॉलचे कर्मचारी संतोष निकम यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारादरम्यान रात्री उशिरा स्वप्नील मगरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत नोंद करण्यात आली. 

हेही वाचा > हृदयद्रावक! वडिलांचा अंत्यविधी आटपायच्या आतच 'ती' परीक्षा केंद्रावर!...डोळ्यांतील अश्रु थांबता थांबेना...

त्याच्या खिशातून दोन-तीन चिठ्ठ्या सापडल्या..त्यात
दरम्यान, स्वप्नील यांनी पाच-सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेतले. परंतु त्यानंतरही तो बेरोजगार होता. त्यातच तो मनोविकाराने ग्रस्त असल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. स्वप्नील यांच्या खिशातून दोन-तीन चिठ्ठ्या सापडल्या असून, एका चिठ्ठीत वडील व भावाला कोणीतरी त्रास देत असल्याचा, तर दुसऱ्या चिठ्ठीत काही डॉक्‍टरांची नावे आहेत. या चिठ्ठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. 

VIDEO :...अन् 'त्याने' चक्क नेलकटरने नागाचे दातच काढले!