चार दिवसांवर लग्न असताना तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृत्यू
सिल्लोड : ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू

सिल्लोड : चार दिवसांवर लग्न असताना तरुणाचा मृत्यू

सिल्लोड : ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पूर्णा नदीवरील सिसाखेडा रस्त्यावर शुक्रवारी (ता.१९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सोमीनाथ रामदास साखळे (वय-२१, रा.सिसारखेडा ता.सिल्लोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णा नदीपात्रातून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या खाली सापडल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूर्णा नदीच्यावर सिसाखेडा रस्त्यावर हा अपघात घडला.

यामध्ये सोमीनाथ गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्यास सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास फौजदार लक्ष्मण कीर्तने करीत आहे.

हेही वाचा: अहमदनगर : धनदांडग्यांसाठी होते कृषी कायदे

याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेत मयत झालेल्या सोमीनाथ साखळे याचे चार दिवसांनंतर लग्न होणार होते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या एकुलत्या एक मुलाचा आईने सांभाळ केला होता.

loading image
go to top