नाशिक : जळीत सांगाड्याचा ‘डीएनए’ तपासणार

डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणात ग्रामीण, शहर पोलिसांचा तपास
DNA of the burnt skeleton will be checked
DNA of the burnt skeleton will be checkedsakal

नाशिक : रायगडनगर-विल्होळी महामार्गाजवळ कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा नेमका कोणत्या महिलेचा आहे, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. घटनेतील कार जरी वाजे यांची असली, तरी तो सांगाडा बेपत्ता असलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का हे तपासण्यासाठी आता डीएनए तपासला जाणार आहे.

DNA of the burnt skeleton will be checked
Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?

नाशिक महापालिकेच्या मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा संदीप वाजे (वय ३८, रा. कर्मयोगीनगर, गोविंदनगरजवळ, नाशिक) या बेपत्ता झाल्याने त्यांच्या पतीने अंबड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असता तत्पूर्वीच, वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आग्रा रोडवरील रायगडनगरजवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनात पूर्णत: जळालेल्या अवस्थेत महिलेचा सांगाडा आढळला होता. वाडीवऱ्हे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास केला असता त्यात सांगाडा महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ. सुवर्णा या मंगळवारी (ता. २५) मोरवाडी हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या. दरम्यान, त्यांना रात्री उशीर झाल्याने पती संदीप वाजे यांनी नातेवाइकांकडे विचारपूस केली; परंतु त्या न परतल्याने त्यांनी मध्यरात्री अंबड पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. जळालेली कार ही वाजे यांचीच असल्याचे चेसीस नंबरच्या मदतीने पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. सांगाडा ज्या गाडीत सापडला ती गाडी डॉ. वाजे यांची असल्याने संबंधित सांगाडा बेपत्ता असलेल्या वाजे यांचाच आहे का हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपासण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

DNA of the burnt skeleton will be checked
हे सरकार जनतेचं की, दारुड्यांचं? तृप्ती देसाई संतापल्या

डीएनए तांत्रिक विश्लेषण

या प्रकरणाचा वाडीवऱ्हे व अंबड पोलिस समांतर तपास करत असून, त्यात अंबड पोलिस तांत्रिक विश्लेषण व कुटुंबाकडून माहिती मिळवत आहेत. तसेच डॉ. सुवर्णा यांच्या पतीकडूनही इत्थंभूत माहिती जाणून घेतली जात आहे. आता ग्रामीण पोलिस फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून वाजे व कुटुंबाच्या मदतीने सांगाड्याचा डीएनए मॅच होता का याची तपासणी केली जाईल.

सांगाडा नेमका डॉ. वाजे यांचा आहे का हे फॉरेन्सिक तपास व डीएनएनुसार समजेल. या संदर्भात कुणाला काहीही माहिती द्यायची असली तर ती द्यावी. संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल. लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण होईल.

-सचिन पाटील,पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com