esakal | जिल्‍ह्यात 35 दिवसांनंतर 3 हजारहून कमी पॉझिटिव्‍ह; 3 हजार 583 कोरोनामुक्‍त
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

जिल्‍ह्यात 35 दिवसांनंतर 3 हजारहून कमी पॉझिटिव्‍ह; 3 हजार 583 कोरोनामुक्‍त

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : कोरोनामुक्‍त होणाऱ्या रुग्‍णांची संख्या वाढत असताना नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत घट होते आहे. तब्‍बल 35 दिवसांनंतर सोमवारी (ता.3) जिल्‍ह्‍यात तीन हजाराहून कमी कोरोना बाधित आढळून आले. दोन हजार 720 पॉझिटिव्‍ह आढळले असतांना, तीन हजार 583 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. 32 बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट झाल्‍याने सद्य स्‍थितीत 36 हजार 011 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

गेल्‍या 29 मार्चला जिल्‍ह्‍यात दोन हजार 847 बाधित आढळून आले होते. त्‍यानंतर सातत्‍याने दर दिवशी तीन हजाराहून अधिक कोरोना बाधित आढळून येत होते. सोमवारी (ता.3) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार 184, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 420, मालेगाव क्षेत्रातील 83, तर जिल्‍हा बाहेरील 33 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार 115, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 255, मालेगाव क्षेत्रातील 173, तर जिल्‍हा बाहेरील 40 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. जिल्‍ह्‍यात झालेल्‍या 32 मृत्‍यूंपैकी सर्वाधिक पंचवीस मृत्‍यू नाशिक ग्रामीणमधील आहेत. शहरात सात बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला.

हेही वाचा: "पराभव पचवायची सवय लावून घ्या…", भुजबळांंचा चंद्रकांत पाटलांंना सल्ला

संशयित रुग्‍णांच्‍या संख्येत झाली घट

सोमवारी सायंकाळी जिल्‍ह्‍यातील चार हजार 503 अहवाल प्रलंबित होते. गेल्‍या काही दिवसांच्‍या तुलनेत या संख्येतही घट झाली आहे. नाशिक शहरातील दोन हजार 532, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 733 तर मालेगाव क्षेत्रातील 238 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात तीन हजार 030 रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील दोन हजार 757 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात सहा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तेरा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 241, मालेगाव क्षेत्रात तेरा रुग्‍ण दाखल झाले आहेत.

हेही वाचा: नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद; नागरिकांच्या चकरा सुरूच

loading image