
नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद; नागरिकांच्या चकरा सुरूच
नाशिक : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कोव्हिशील्ड (Covishield) व कोव्हॅक्सिन (Covaxin) लस टोचण्याची सुरू केलेली मोहीम (Vaccination) सोमवारी (ता. ३)देखील पुरवठा न झाल्याने बंद पडली होती. लशींचे डोस प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Vaccination closed for third day in a row in Nashik)
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून जिल्हा रुग्णालयाकडे कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त होतात. आतापर्यंत महापालिकेला कोव्हिशील्डचे दोन लाख ५१ हजार ६५० डोस, तर कोव्हॅक्सिनचे ४३ हजार ९६० डोस प्राप्त झाले होते. कोव्हॅक्सिन डोस काही प्रमाणात शिल्लक असल्याने गुरुवारपर्यंत मोहीम अडखळत पार पडली. आरोग्य विभागाने महापालिकेला सोमवारी ३० हजार लशींचे डोस उपलब्ध करून दिल्याने त्यावर मोहीम सुरू राहिली. गुरुवारी सकाळी सुमारे साडेअकरा हजार डोस पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले. मात्र शुक्रवारी संपूर्ण डोस संपुष्टात आल्याने शनिवार व रविवार असे दोन दिवस लसीकरण बंद करण्यात आले होते. रविवारी डोस प्राप्त होऊन सोमवारपासून पुन्हा नव्याने मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु डोस न आल्याने सलग तिसऱ्या दिवशी मोहीम बंद राहिली. लस कधी प्राप्त होणार याबाबत निश्चिती नाही.
हेही वाचा: "पराभव पचवायची सवय लावून घ्या…", भुजबळांंचा चंद्रकांत पाटलांंना सल्ला
महापालिकेच्या २७ व खासगी २२ केंद्रांवर नागरिकांच्या रोजच्या चकरा सुरू आहेत. आरोग्य विभागाकडे जास्त लशींची मागणी नोंदविण्यात आली आहे. साठा उपलब्धतेनुसार लसीकरण केले जात असल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या समन्वयक डॉ. अजिता साळुंखे यांनी दिली.
हेही वाचा: नाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट
Web Title: Vaccination Closed For Third Day In A Row In Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..