esakal | बाजार समित्या सुरू होणार? नुकसान पाहता लवकरच तोडगा निघणार
sakal

बोलून बातमी शोधा

market committee

बाजार समित्या सुरू होणार? नुकसान पाहता लवकरच तोडगा निघणार

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : कडक निर्बंधांच्या (lockdown) काळात शेतकऱ्यांचे (farmer) नुकसान होऊ नये यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू ठेवण्याबाबत नाशिक बाजार समितीचे सभापती व जिल्हा उपनिबंधक यांची गुरुवारी (ता. १३) बैठक होणार आहे. या बैठकीत शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समित्या (market committee) सुरू ठेवण्याबाबत तोडगा निघणार असल्याची माहिती सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली.

सभापती पिंगळे करणार जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा

दरम्यान, या संदर्भात बुधवारी (ता. १२) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी आपण चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण १६ बाजार समित्या असून, प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारचा शेतमाल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असतो. जिल्ह्यासह राज्याच्या बाहेरही शेतमाल पाठविला जातो. यातून रोज कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र, सध्या जिल्ह्यात २३ मेपर्यंत निर्बंध अधिक कडक केलेले असल्याने बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या काळात होण्याची शक्यता आहे. अशा पार्श्‍वभूमीवर आपण स्वतः जबाबदारी स्वीकारत शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समिती सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्या सूचनेनुसार गुरुवारी सकाळी अकराला जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याशी बैठकीत चर्चा करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिकमधील ‘त्या’ भुयारी मार्गाचे गूढ कायम; पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची गरज

शेतकऱ्यांना दिलासा

बाजार समिती बंदमुळे शेतकरी चिंतेत असून, शेतमालाची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्‍न त्यांना पडलेला आहे. अशातच सभापती पिंगळे यांनी पुढाकार घेतल्याने गुरुवारच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: लॉकडाऊनमुळे जिम व्यवसायिकांची आर्थिक कोंडी; सलंग्न व्यवसायावरही परिणाम

loading image