शहरात मुलींच्या जन्मदरात घट; मागील वर्षाच्या अहवालातून बाब स्पष्ट | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Birthrate of girl child Latest Marathi news

शहरात मुलींच्या जन्मदरात घट; मागील वर्षाच्या अहवालातून बाब स्पष्ट

नाशिक :स्त्री समानतेचा कितीही नारा दिला, तरी मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण (Birth Rate) अद्यापही कमीच आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिका (NMC) हद्दीत हे प्रमाण किंचित कमी होते. मात्र, मागील वर्षाच्या अहवालात स्त्री जन्माच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत एक हजार मुलांमागे ८८८ मुलींचे प्रमाण असल्याची बाब महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. (decline in birth rate of girl child in city nashik Latest Marathi News)

मुलींचे जन्माचे प्रमाण वाढावे, यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. लिंगनिदान चाचणी बंदी हा त्यातील सर्वांत प्रभावी उपाय ठरत आहे. त्याचबरोबर जनजागृतीवरही भर दिला जात आहे.

मात्र असे असले, तरी नाशिक शहरात मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांपेक्षा कमी असल्याचे आढळून येत आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत हजार मुलांमागे सरासरी ८८८ मुली जन्माला आल्याची बाब अहवालातून स्पष्ट झाली आहे.

लिंग गुणोत्तरात मोठा फरक का पडला, याबाबत मात्र स्पष्टीकरण देता आले नाही. तरीही यामागे कोविडचे मुख्य कारण असल्याची बाब समोर येत आहे. कोविड काळात संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा रुग्णांवर उपचारासाठी कार्यरत होती.

त्यामुळे अन्य बाबींकडे लक्ष दिले गेले नाही. जसे, की लिंग निदान केंद्रांची नियमित तपासणी, महापालिका हद्दीत ३२२ सोनोग्राफी सेंटर आहेत. या सेंटरची तपासणी करण्यासाठी ४० वर्षीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

दोन वर्षांच्या काळात केंद्रांची तपासणी झाली नसल्याचा संशय व्यक्त होत आहे. या वर्षाच्या सहा महिन्यांत मुलींच्या जन्माचे हजार मुलांमागे प्रमाण असे : जानेवारी ८४५, फेब्रुवारी ९७३, मार्च ८७३, एप्रिल ८४२, मे ८८७, जून ९०७.

हेही वाचा: रस्ता 50 फूट; अतिक्रमण 30 फूट : देवपूरची विदारक स्थिती

मागील वर्षातील मुलींच्या जन्माचे प्रमाण (हजार मुलांमागे)

जानेवारी ८४९, फेब्रुवारी ९६०, मार्च ७७०, एप्रिल ९९३, मे ९३५, जून ९१७, जुलै ९२९, ऑगस्ट ९१४, सप्टेंबर ८६७, ऑक्टोबर ८९६, नोव्हेंबर ८८१, डिसेंबर १००४. मागील वर्षी डिसेंबरअखेर मुलींच्या जन्माचे प्रमाण ९११ होते.

हेही वाचा: Corona Update : जिल्ह्यात 21 पॉझिटिव्‍ह; 99 रुग्‍ण कोरोनामुक्‍त

Web Title: Decline In Birth Rate Of Girl Child In City Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..