Nashik News: पाथरे येथे उसाच्या शेत्तात आढळला वृद्धाचा कुजलेला मृतदेह; दीड महिन्यापासून होते बेपत्ता

सिन्नर येथील 96 वर्षीय वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ते राहत घराशेजारच्या उसाच्या शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Death
Deathesakal

वावी : गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पाथरे खुर्द ता. सिन्नर येथील 96 वर्षीय वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ते राहत घराशेजारच्या उसाच्या शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Decomposed body of old man found in sugarcane field in Pathre missing for one half months Nashik News)

पंडितराव बाबुराव चिने हे गेल्या 25 डिसेंबरच्या दिवशी घरातून बेपत्ता झाले होते. पाथरे गावातील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव यादरम्यान सुरू होता.

पाथरे खुर्द शिवारात गोदावरी कालव्यालगत असलेल्या चिने वस्तीवर ते आपला मुलगा व कुटुंबासोबत वास्तव्यास होते. बेपत्ता झाले त्या दिवशी दुपारपर्यंत श्री. चीने घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी दोन दिवस त्यांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला होता त्यानंतर वावी पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.

दरम्यान मंगळवारी दुपारी चिने यांच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम करणाऱ्या मजुरांना दुर्गंधी आली. त्यांनी काम थांबवत आतमध्ये जाऊन शोध घेतल्यावर अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला.

चिने कुटुंबीयांनी धाव घेत पाहणी केली असता सदर मृताच्या अंगावरील कपडे पंडितराव चिने यांचे असल्याचे स्पष्ट झाले. सदर प्रकाराची माहिती वावी पोलीस ठाण्यात कळविण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Death
Jalgaon Crime News : पतीकडून 5 लाखांसाठी छळ विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मृताच्या अंगावरील कपड्यांवरून कुटुंबीयांनी तो मृतदेह पंडितराव चिने यांचा असल्याचे सांगितले. सुमारे दीड महिन्यांपासून मृतदेह कुजलेला असल्यामुळे वावी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल रॉय यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद घेतली आहे.

राहत्या घरापासून शेतामध्ये अवघ्या तीनशे मीटर अंतरावर पंडितराव चिने यांचा मृतदेह आढळून आला. वयाची शंभरी गाठली तरी श्री. चीने हे संपूर्ण शेताला फेरफटका मारायचे. बेपत्ता झाले त्या दिवशी देखील ते कदाचित नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी गेले असावेत. उसाच्या शेतातून पुढे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला असावा.

कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते तोडणीला आलेल्या व पूर्ण वाढ झालेल्या उसाच्या शेतात जातील असा अंदाज कुणाला आला नव्हता. परिसरात बिबट्यांचा देखील वावर असल्याने चीने यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

Death
Crime News: भाडयाने फ्लॅट घेण्याच्या बहाण्याने; मालकाला घातला लाखोंचा गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com