हवेतून ऑक्सिजननिर्मितीवर विजेच्या लपंडावामुळे विपरीत परिणाम!

वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा, गेल्या तीन दिवसांमध्ये हवेतून ऑक्सिजननिर्मितीवर(Oxygen production) विपरीत परिणाम झाला आहे.
Oxygen Plant
Oxygen Plante-sakal
Updated on

नाशिक : वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा, गेल्या तीन दिवसांमध्ये हवेतून ऑक्सिजननिर्मितीवर(Oxygen production) विपरीत परिणाम झाला आहे. रवींद्र, अक्षय, सनी आणि स्वस्तिक या कंपन्यांच्या हवेतून ऑक्सिजन उत्पादनात ११ टनांनी घट आली आहे. सोमवारी (ता. १७) हवेतून ऑक्सिजननिर्मितीतून १७.९ आणि लिक्विड ऑक्सिजनमधून(Liquid Oxygen) १२८ असा एकूण १४५.९ टन ऑक्सिजन उपलब्ध झाला.(Decrease oxygen production from air due to electricity cut off)

तीन दिवसांतील परिणाम

बाहेरून उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनपैकी एका कंपनीकडून तीन दिवसांनी लिक्विड ऑक्सिजन नाशिकसाठी उपलब्ध होतो. शिवाय राज्याबाहेरून येणारा लिक्विड ऑक्सिजनचा टँकर पोचण्यासाठी किमान अडीच दिवसांचा कालावधी लागतो. या पार्श्‍वभूमीवर २४ तासांपूर्वी उपलब्ध झालेल्या ऑक्सिजनपैकी ३१ टन ऑक्सिजनचा पुरवठा थेट रुग्णालयांना झाला आहे. उरलेला ९७ टन लिक्विड ऑक्सिजन रिफिलिंग(oxygen refilling) कंपन्यांना देण्यात आला. त्यामुळे मंगळवारी पिनॅकल, सनी, निखिल, श्रीगणेश, पुष्पक, नाशिक ऑक्सिजन, गजानन, यश या कंपन्यांकडे ऑक्सिजन उपलब्ध असल्याची माहिती शहरातील रुग्णालयांना अन्न-औषध विभागातर्फे कळविण्यात आली.

Oxygen Plant
नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सराईताचा गोंधळ; डॉक्टरांना धक्काबुक्की

सोळा टनांचा राखीव साठा

शहरासाठी उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनपैकी १६ टनांचा साठा राखून ठेवण्यास सुरवात झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा साठा वापरण्यात येणार आहे. ऑक्सिजन साठ्याची स्थिती कायम राहिली आहे. याशिवाय अन्न-औषध प्रशासनातर्फे रुग्णसंख्या कमी होत असल्याने ऑक्सिजनच्या साठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Oxygen Plant
कोरोना काळात गडकरींना फायदा, Youtube कडून मिळत असलेल्या कमाईचा सांगितला आकडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com