esakal | नाशिक शहर पोलिस ठाण्यांना नवे कारभारी; 3 महिला अधिकाऱ्यांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

 Police

नाशिक शहर पोलिस ठाण्यांना नवे कारभारी; 3 महिला अधिकाऱ्यांचा समावेश

sakal_logo
By
विनोद बेदरकर


नाशिक : पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरातील सगळ्या प्रशासकीय कामकाजाची फेररचना केली आहे. त्यामुळे सगळ्या पोलिस ठाण्यांना नवीन कारभारी मिळाले आहे. आगामी महापालिका निवडणूकांच्या तोंडावर नवीन कारभाऱ्यांना ठाण्यातर्गतची कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत पुरेसा वेळ मिळणार आहे.


शहर पोलिस आयुक्तालयात नवीन सहायक निरिक्षक, उपनिरिक्षक दर्जाचे अधिकारी मिळाले आहे. यात तीन महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयाकडून करण्यात आलेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक भगत यांची आठवडाभरात पंचवटीतून पोलीस अकादमी आणि अकादामीतून आता पून्हा ठाणे शहरात बदली झाली आहे. पोलीस निरिक्षक भरतसिंग पराडके यांना नाशिक पोलीस आयुक्तालयातच मुदतवाढ मिळाली. शहराच्या पोलीस दलात नव्याने नागपुर येथून निशस्त्र सहायक निरिक्षक म्हणून सुवर्णा रंगनाथ हांडोरे यांची बदली करण्यात आली आहे. तसेच मुंबई येथील स्नेहा बर्वे या दोन महिला आधिकारी पोलीस दलाला नव्याने मिळाल्या. मुंबई येथील निशस्त्र उपनिरिक्षक सोनल चंद्रभान फडोळ यांचीही शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तसेच मुंबई येथील उपनिरिक्षक भटु प्रभाकर पाटील यांचीही नाशिक शहर पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सहायक निरिक्षक अमोल खोंडे यांची ठाणे शहर पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री भुजबळांचा राजीनामा का घेत नाहीत? किरीट सोमय्यांचा प्रश्न


पोलीस ठाण्याचे नवीन कारभारी

पंचवटी पोलिस ठाणे : डॉ सीताराम कोल्हे
भद्रकाली पोलिस ठाणे : संभाजी निंबाळकर
सरकारवाडा पोलिस ठाणे : सुनील जाधव
मुंबई नका पोलिस ठाणे : भगीरथ देशमुख
गंगापूर पोलिस ठाणे : रियाझ शेख
इंदिरा नगर पोलिस ठाणे : श्रीपाद परोपकारी
नाशिक रोड पोलिस ठाणे : अनिल शिंदे
उपनगर पोलिस ठाणे : निलेश माईणकर
शहर वाहतूक शाखा : साजन सोनवणे

हेही वाचा: तलाठ्याने परस्पर आठ एकर जमीन केली पत्नीच्या नावावर; गुन्हा दाखल

loading image
go to top