Nashik Crime: विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी दीपिका चव्हाण, पालखेडकर यांची शाळेला भेट; गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिक्षकाने आम्हा सहा विद्यार्थीनींशी सातत्याने अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती अधिक्षिका स्वाती पगार यांनी दिली होती.
Deepika Chavan, Palkhedkar visit the school in the case of student abuse
Deepika Chavan, Palkhedkar visit the school in the case of student abuseesakal

Nashik Crime : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील एका शासकीय निवासी शाळेतील शिंदे दिगर (ता. सुरगाणा) येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या सहा आदिवासी विद्यार्थिनींशी विनोद कहार या शिक्षकाने अश्लील वर्तन करून त्यांचा सातत्याने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्याने घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दीपिका चव्हाण व महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली दीपक पालखेडकर यांनी रविवारी (ता. २१) शाळेला भेट देऊन संबंधित पीडित विद्यार्थिंनींची भेट घेतली आणि पालक व विद्यार्थिंनींशी संवाद साधला. (Deepika Chavan Palkhedkar visit school in case of student abuse nashik crime news)

दरम्यान, सौ. चव्हाण व सौ. पालखेडकर यांनी दुपारी पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांची भेट घेऊन संबंधित शिक्षकावर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणीही केली. काही महिन्यांपासून शिंदे दिगर (ता. सुरगाणा) येथील शाळेतील सर्व विद्यार्थी अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील एका शासकीय निवासी शाळेत शिक्षण घेत आहेत.

नुकतेच स्त्री अधिक्षिका स्वाती पगार यांनी सर्व विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन आईप्रमाणे विचारपूस करताच आदिवासी विद्यार्थिनींनी शिंदे दिगर शाळेतील विनोद कहार या शिक्षकाने त्यांच्यासोबत केलेल्या गैरकृत्याचा पाढाच वाचला. या शिक्षकाने आम्हा सहा विद्यार्थीनींशी सातत्याने अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती अधिक्षिका स्वाती पगार यांनी दिली होती.

या गंभीर घटनेबाबत अधिक्षिका पगार यांनी तत्काळ नव्याने नियुक्त झालेले प्राचार्य अशोक बच्छाव यांना माहिती दिली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आदिवासी संघटना आणि पालकांनी संबंधित शिक्षकाला अटक करण्याची मागणी केली. प्राचार्य बच्छाव यांनी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे संबंधित घटनेचा अहवाल सादर केला.

'या प्रकरणी आयुक्त गुंडे यांनी तत्काळ संबंधित शिक्षक कहार व स्त्री अधीक्षिका स्वाती पगार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि प्राचार्य बच्छाव यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली.

Deepika Chavan, Palkhedkar visit the school in the case of student abuse
Nashik Crime News : परिमंडळ दोनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन; सराईत गुन्हेगारांची धरपकड

दरम्यान, शनिवारी (ता. २१) राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी आयुक्त नयना गुंडे व पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांना निवेदन देऊन नहार याच्यावर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. रविवारी माजी आमदार सौ. चव्हाण व महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी अचानक शाळेला भेट देऊन पीडित विद्यार्थिंनींशी संवाद साधला.

या वेळी विद्यार्थिंनींनी कहार या शिक्षकाबाबत धक्कादायक माहिती दिली. गैरकृत्य केल्यानंतर याबाबत कुणाकडे वाच्छता केल्यास तुम्हाला नापास करून टाकू, अशी दमदाटीही शिक्षक कहार करीत असल्याचे विद्यार्थिनींनी यावेळी सांगितले. त्यामुळे आम्ही घाबरून कुणाकडेही सांगू शकत नव्हतो.

मात्र अधिक्षिका स्वाती पगार यांनी आमच्याकडे विचारपूस केल्यामुळे आम्ही त्यांना हा प्रकार सांगू शकल्याचे पीडित विद्यार्थिंनींनी सांगितले. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, अनेक विद्यार्थिनींबाबात अशी घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या शमा दंडगव्हाळ, प्राचार्य अशोक बच्छाव, प्राचार्य सुरेश देवरे आदींसह शिक्षक व पालक उपस्थित होते.

Deepika Chavan, Palkhedkar visit the school in the case of student abuse
Nashik Crime News : प्रेयसी खूनप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

आदिवासी पॅंथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. तुळशीराम खोटरे व पालकांनी सौ. चव्हाण व सौ. पालखेडकर यांची भेट घेऊन निवेदन देत संबंधित शिक्षकावर कारवाईची तसेच प्राचार्य अशोक बच्छाव व स्त्री अधिक्षिका स्वाती पगार यांचे कामकाज अत्यंत चांगले असून त्यांच्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यामुळे ते निर्दोष असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी केली. सौ. चव्हाण व सौ. पालखेडकर यांनी पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांची भेट श्री. सूर्यवंशी यांनी पीडित विद्यार्थिंनींच्या पालकांनी याप्रकरणी तक्रार देण्याचे आवाहन केले. तक्रार दाखल होताच नराधम शिक्षकावर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले.

''गैरवर्तणूक करणाऱ्या शिक्षकाचे केवळ निलंब न करता त्यावर कठोर कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे. तसेच हे प्रकरण ज्यांनी उघडकीस आणले त्या महिला अधीक्षिका स्वाती पगार निर्दोष असून त्यांना पूर्ववत सेवेत घेण्यात यावे, अशी आम्ही सर्व पालकांच्या वतीने प्रशासनास विनंती करीत आहोत.''-प्रा. तुळशीराम खोटरे, विद्यार्थिनी पालक.

Deepika Chavan, Palkhedkar visit the school in the case of student abuse
Nashik Crime News : परिमंडळ दोनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन; सराईत गुन्हेगारांची धरपकड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com