Nashik News : ‘त्या’ महसूल कर्मचाऱ्यांचे घुमजाव! निवेदनातील मजकुराबाबत अनभिज्ञ असल्याचा खुलासा

Nandgaon Tahsil Office
Nandgaon Tahsil Officeesakal
Updated on

नांदगाव (जि. नाशिक) : बाणगावचे महसूल मंडळ अधिकारी एन. बी. पैठणकर यांच्या निलंबनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावयचे आहे, असे सांगून संघटना पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात सर्वांना जमविले. मात्र, निवेदनातील मजकूराबाबत अनभिज्ञ ठेवले व त्यातील कुठलाही मजकूर वाचू न देता सह्या घेतल्या आहेत. असा बचावात्मक खुलासा येथील तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी केल्याने तहसील कार्यालयात खळबळ उडाली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Nandgaon Tahsil Office
Nashik News : जायखेड्यातील जवानाचा आसाममध्ये मृत्यू

नांदगावचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांना भेटले होते. येथील तहसीलदार डॉ. मोरे हे कामकाजाविषयक संकलनात आपल्या मनाप्रमाणे वारंवार फेरबदल करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या आकृतिबंधातील संकलन निकषाला बाजूला सारून त्यांनी आतापावेतो वीस ते पंचवीस वेळा संकलनात बदल केल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटीत केला होता.

या निवेदनावर अव्व्ल कारकून संतोष डुंबरे यांच्यासह एकूण नऊ महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश शिरसाठ यांच्यासह वीस तलाठ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तहसीलदार मोरे यांच्यासमवेत यापुढे काम करणे शक्य नसल्याने आम्हाला सामूहिक रजेवर जाऊ देण्याची मागणी त्यात केली होती.

मात्र, या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. २६) घुमजाव करीत निवेदनातील मजकूराबाबत आम्हाला अनभिज्ञ ठेवले व त्यातील कुठलाही मजकूर वाचू न देता सह्या घेतल्या असल्याचा लेखी खुलासा जिल्हाधिकारी यांना पाठविला आहे. त्यावर ए. आर. जाधव, डी. एफ. बागडे, एस. एस. राठोड, एम. एन. पाटील, एच. ए. आसने, पंकज जगताप, संजय खरात, अरुण सोनवणे, तलाठी आर. एम. परदेशी, जी. एस. ननई, एस. एम. गुळवे, पी. आर. नागलवाडे, एन. के. शिंदे, बी. एस. कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Nandgaon Tahsil Office
Nashik News :...अन् चक्क गुलमोहराच्या झाडातून निघू लागलं पाणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com