Agricultural Input Sellers Degree: कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम

National Institute of Agricultural Extension
National Institute of Agricultural Extensionesakal

Agricultural Input Sellers Degree : राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध संस्थान (हैदराबाद) यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी ४८ आठवड्यांचा पदविका अभ्यासक्रम तयार केला आहे.

या अभ्यासक्रमास जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले आहे. (Degree Course for Agricultural Input Sellers nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

National Institute of Agricultural Extension
Nashik Agriculture: 50 टक्के पेरणी, शेतकऱ्याचे आभाळाकडे डोळे

जिल्ह्यात मोठ्या संख्येने कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना निविष्ठा सेवा पुरविण्याचे काम करतात. परंतु निविष्ठांचा दर्जा, प्रमाण, वापर याबाबत शेतकऱ्यांना अचूक सल्ला व मार्गदर्शन करता यावे, यासाठी या अभ्यासक्रमाचे नियोजन केले आहे.

अभ्यासक्रमात कृषी तज्ज्ञ अभ्यासक यांच्यामार्फत ४० अभ्यासवर्ग व ८ क्षेत्रीय भेटींमार्फत तांत्रिक प्रशिक्षण माहिती दिली जाणार आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निविष्ठा विक्री केंद्राचा परवाना (स्वत:चे नाव असलेला परवाना किंवा भागीदार असल्यास करार प्रत), दहावी पास असल्याचा पुरावा मार्कशिट किंवा प्रमाणपत्र, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकारातील छायाचित्र इत्यादी आवश्यक आहे.

अनुदानित अभ्यासक्रमासाठी १० हजार रुपये व विना अनुदानित अभ्यासक्रमास २० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रवेश अर्जासाठी तसेच अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक (आत्मा) नाशिक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

National Institute of Agricultural Extension
Nashik News: वणीतील मुरमुरा कारखान्याविरोधात कार्यवाही; शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ यांच्या तक्रारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com