कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीचा फरक मिळण्यासाठी 'तारीख पे तारीख' | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Worker

कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीचा फरक मिळण्यासाठी 'तारीख पे तारीख'

एकलहरे (नाशिक) : नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील (Nashik Thermal Power Station) कंत्राटी कामगारांचा (Contract workers) वेतनवाढीचा फरक दोन वर्षे उलटून गेल्यावर ही अद्याप देण्यात आलेला नाही. हा फरक तात्काळ मिळावा यासंदर्भात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेकडून स्थानिक प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.

औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना जानेवारी २०२० पासून आज पर्यंत मंजूर झालेला किमान वेतनवरील फरक दोन ते तीन कंत्राटदार वगळता इतर कंत्राटदारांनी हा फरक अद्याप पावेतो दिलेला नाही. या महिन्याच्या २० तारखे नंतर आता ३० तारखेनंतर दिला जाईल असे सांगितल जातय. त्यामुळे सध्या 'तारीख पे तारीख' सुरू असल्याने कामगारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

हेही वाचा: नाशिक : कोरोनाच्या नावाखाली दांड्यांचा प्रघात

कामगार जगताहेत हलाखीचे जीवन

कंत्राटी कामगारांना वाढत्या महागाईत हलाखीचे जीवन जगण्याचा प्रसंग निर्माण झालेला आहे. प्रशासनाने वारंवार आदेश करूनही कंत्राटदार जैसे थे तशीच परिस्थिती लावून ठेवत आहे असा आरोप संघटनेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर बरेच कंत्राटदार वेळेवर पगार करत नाही त्यामुळे राशन भरण्यास व मागील उधारी चुकवली नाही म्हणून पुढचे राशन दुकानदार देण्यास तयार होत नाही .कंत्राटी कामगारांवर अनेकदा उसनवारी करून कर्ज घेऊन घरखर्च भागवण्याची वेळ आली आहे.यामुळे कंत्राटी कामगारांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

'सकाळ'ने वाचा फोडावी - कामगारांची मागणी

किमान वेतनाचा प्रश्न संबधी दैनिक 'सकाळ'ने वाचा फोडल्यावर कंत्राटी कामगारांचे काही अंशी दोनशे ते तीनशे रुपये रोजंदारीत वाढ झाली होती. आता वेतन वाढी चा फरक मिळावा यासाठी 'सकाळ'ने पुन्हा वाचा फोडावी अशी मागणी कामगारांनी केली आहे.

''वेतन वाढीचा फरकचे परिपत्रक येऊन दोन वर्ष उलटूनही अद्याप पावेतो वेतनवाढ फरक मिळालेला नाही.हा फरक कधी मिळणार ? याकडे कामगार डोळे लावून बसला आहे.'' - जितेंद्र पाटील (सचिव ,महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ)

हेही वाचा: Nashik l सकाळची बातमी इम्पॅक्टची हमी l Sakal News Impact Guarantee | Sakal Media

Web Title: Delay To Difference Of Salary Increment Of Workers Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikworkersalary