Unseasonal Rain Damage : हंगामात शेणखताची मागणी घटली; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान

A tractor trolley loaded with cow dung
A tractor trolley loaded with cow dungesakal

Unseasonal Rain Damage : गाई-म्हशीचे शेणखत, मेंढी खत, व कोंबडी खत इत्यादी खतांचा वापर शेतकऱ्यांकडून पीक चांगले यावे, जमिनीची पोत उत्तम राहावी यासाठी करत असतो. करतो. सेंद्रिय शेतीतील शेणखत हा महत्त्वाचा घटक मानला जातो.

शेतीत मार्च ते मे पर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेणखताला चांगली मागणी असते. द्राक्ष छाटणी नंतर वेलीच्या बुडाशी तसेच डाळिंब, बोर, पेरू, झाडांच्या बुडाशी शेणखत टाकले जाते.

बागायत, जिराईत मोकळ्या शेतामध्ये शेणखताचे ढीग टाकून नंतर पसरले जातात. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले असल्याने शेणखताची मागणी घटली आहे. (demand for dung fell during season Damage due to unseasonal rain hail nashik news)

यंदा गाव परिसरात अनेक गावांमध्ये बेमोसमी पावसाचा धुमाकूळ सुरू असून गारपीट झाली. बेमोसमी पावसामुळे लाखो रुपयाचे कांदा पिकाचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा याचा आर्थिक फटका बसला आहे.

जे बागायतदार ५० ट्रॉलीच्या पुढे शेणखत घेत, ते निम्म्यापेक्षा कमी खत खरेदी करीत आहेत. हंगाम चांगला यायचा तेव्हा शेतकरी शेणखतासाठी आगावू रक्कम देऊन शेणखत राखीव करून घेत होते.

सद्यःस्थितीत शेणखताला मागणी घटली आहे. शेत ओली आहेत. शेतात नुकसान कांद्याचा पसारा पडला आहे. द्राक्ष, डाळिंब, बोर, पेरू बागायतदारांना पिकांसाठी शेणखताची मोठी गरज भासते.

शेतीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत टाकण्याकडे कल वाढला आहे. शेणखतावर तात्पुरता पर्याय म्हणून रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यातून उत्पादन वाढत असले तरी दिवसेंदिवस शेतीचा कस कमी होत आहे.

दिवसेंदिवस पशुधन कमी होत आहे. मात्र या भागात संकरित गायींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे शेणखताचे प्रमाण वाढले. दुग्ध व्यवसायापासून आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी संकरित गाईंच्या संख्येत वाढ होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A tractor trolley loaded with cow dung
Onion Rate : 2 महिन्यानंतर कांद्याचा भाव वधारणार? शेतकऱ्यांना आशा

संकरित गायींसाठी लागणारा चारा, पशुखाद्य किमती वाढल्याने कर्जाचे हप्ते फिटण्यासाठी साठवलेले शेणखत विक्रीसाठी बरीच शेतकरी तयार असतात. मात्र मागणीची घट लक्षात घेता भाव वाढले नाहीत.

वारंवार अवकाळी गारपीठांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्यामुळे शेणखताची मागणी घटली आहे. परिसरात कोरड्या शेणखताला चांगला भाव मिळतो.

खत प्रकार दर (अंदाजे, एका ट्रॉलीस)

गाय-म्हैस ४ ते ५ हजार

मेंढी ४ ते साडेहजार रुपये,

ओले शेणखत ९ हजार (ट्रक)

कोंबडी खत वजनावर

A tractor trolley loaded with cow dung
Tomato Price Fall : भाव घसरल्याने टोमॅटोची लाली उतरली; उत्पादकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com