esakal | मनमाडला ऑक्सिजनयुक्त रेल्वे कोचची मागणी; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

manmad.jpg

त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी ससाणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे, पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या अधिकाऱ्यांना कोविड सेंटर व्हावे, अशी इच्छाच नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

मनमाडला ऑक्सिजनयुक्त रेल्वे कोचची मागणी; वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका

sakal_logo
By
अमोल खरे

नाशिक : (मनमाड) शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता येथे ऑक्सिजन बेड कोविड सेंटर सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, शुक्रवारी (ता. २५) वंचितचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आरोग्य, पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. सेंटर होईपर्यंत ऑक्सिजनयुक्त रेल्वे कोच उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

तर मात्र वंचितकडून अधिक तीव्र आंदोलन...

मनमाड शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५० पर्यंत गेली आहे. यात भीतीपोटी स्वॅब न दिलेले घरीच उपचार घेत आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून, त्यांना वेळेवर बेड मिळत नसल्याने त्यांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी ससाणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे, पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या अधिकाऱ्यांना कोविड सेंटर व्हावे, अशी इच्छाच नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. कोविड सेंटर सुरू नाही झाले तर वंचितकडून अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, शहराध्यक्ष पी. आर. निळे, जिल्हा महासचिव संतोष भोसले, कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा नेते यशवंत बागूल, जिल्हा संघटक उमेश भालेराव, शहर सचिव सुरेश जगताप, कैलास गोसावी, अन्वर मन्सुरी, साहेबराव अहिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

loading image
go to top