Nashik News: देवळा बाजार समितीचे शेतकरी निवास खुले! शेतकऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन

Chairman Yogesh Aher while opening the farmers residence of Devla Bazar Samiti Bazar Samiti.
Chairman Yogesh Aher while opening the farmers residence of Devla Bazar Samiti Bazar Samiti.esakal

Nashik News : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी प्रतीक्षेत असलेले देवळा बाजार समितीचे शेतकरी निवास सोमवार (ता.१२) रोजी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत खुले करण्यात आले.

याशिवाय बाजार समिती आवारात शेतीमालाच्या लिलावासाठी येणाऱ्या वाहनांना टोकन पद्धत चालू करत शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी देवळा बाजार समिती प्रयत्नशील असल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. (Deola Bazar Samiti shetkari niwas Opened Inauguration by farmers Nashik News)

वाखारवाडी येथील विष्णू निकम यांच्या हस्ते नवीन शेतकरी निवासाचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, शिवाजीराव पवार, भास्कर माळी, भावराव नवले, जगदीश पवार, भगवान जाधव, रमेश मेतकर, विजय सोनवणे, पंडितराव निकम, सचिव माणिक निकम, गणेश शेवाळे, खामखेड्याचे सरपंच वैभव पवार, गोटू शिंदे, प्रहार शेतकरी संघटनेचे बापू देवरे, कारभारी देवरे, भाऊसाहेब मोरे, अंतु पवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभापती योगेश आहेर म्हणाले, की शेतकऱ्यांना येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लवकरच स्वच्छ व थंड पाणी शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chairman Yogesh Aher while opening the farmers residence of Devla Bazar Samiti Bazar Samiti.
Nashik News: सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यावरील स्थगिती उठली; आमदार दिलीप बोरसे यांची माहिती

यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांकडून स्वच्छतागृह, पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी, निवासाची आधुनिक सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, लिलावातील वाहनांना टोकन पद्धत, चांगले उपाहारगृह आदी बाबींची मागणी करण्यात आली.

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तसेच, प्रहार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी याबाबत आग्रह धरल्याने बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत शेतकरी निवास शेतकऱ्यांसाठी खुले केले.

दोरी पद्धत बंद करून टोकन द्वारे क्रमांक देत ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ सिस्टीम सुरू केली. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने यांनी आभार मानले.

Chairman Yogesh Aher while opening the farmers residence of Devla Bazar Samiti Bazar Samiti.
Nashik: डॉ. मंगरूळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी; नाशिक विभागात उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com