Onion
sakal
देवळा: यंदा उन्हाळ कांद्याचे भाव वाढले नसले, तरीही नवी आशा-नवी उमेद मनी बाळगून ‘कसमादे’ भागात कांदालागवड जोमात सुरू आहे. शेतशिवारात सगळीकडे उळे, मजूर, खते, पाणी देणे याचीच धावपळ दिसून येते. परतीच्या पावसामुळे यंदा सगळीकडे मुबलक पाणी आहे. मात्र, मजूर उपलब्ध होत नसल्याने चहा, फराळ देत मजुरांची सरबराई केली जाते. काही भागांत ट्रॅक्टरच्या मशिनने कांदा लागवड सुरू आहे.