नाशिक- देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील टीडीआर घोटाळ्याची शासनाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश देताना २०२० मध्ये महापालिकेने नियुक्ती केलेल्या चौकशी समितीचीदेखील चौकशी होणार आहे. या घोटाळ्यासंदर्भात मुंबई येथील एका व्यक्तीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे घोटाळ्या संदर्भातील कागदपत्रे सादर करत नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महापालिकेचे माजी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह शाह कुटुंबातील तीन, मनवानी कुटुंबातील तिघे व तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.