नाशिक- मागील दहा वर्षांपासून गाजत असलेल्या देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील टिडीआर घोटाळ्याची पुन्हा नव्याने चौकशी होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पाच सदस्यांची कमिटी स्थापन केली आहे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे या समिती अध्यक्ष असतील. त्यांना पुढील दहा दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.