Sant Nivruttinath Yatrotsav : पालघर, ठाणे, गुजरातमधील दिंड्या रवाना; हरिनामाचा जागर

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी वाडा तालुक्यातून पायी दिंड्या खोडाळा-देवगाव-त्र्यंबकेश्वर या मार्गावरून जात असून, टाळ मृदंगाच्या गजर होत आहे.
devotees go to Trimbakeshwar.
devotees go to Trimbakeshwar.esakal

Sant Nivruttinath Yatrotsav : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी वाडा तालुक्यातून पायी दिंड्या खोडाळा-देवगाव-त्र्यंबकेश्वर या मार्गावरून जात असून, टाळ मृदंगाच्या गजर होत आहे.

ठिकठिकाणांवरून निघालेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांना मनोभावे निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहेत. (Departure from dindi in Palghar Thane Gujarat at trimbakeshwar for Sant Nivruttinath Jatrotsav nashik news)

वाडा तालुक्यातील मेट, देवघर, नांदणी, अंभरभुई, दिनकरपाडा (कोंढले विभाग), लोहपे, खानिवली, गुंज, आबिटघर, तिळसा, खरीवली, तर भिवंडी तालुक्यातील झिडके, दिघाशी यांच्यासह पंधराहून अधिक दिंड्या निघाल्या आहेत. सर्वच रस्ते दिंड्यांनी फुल्ल झाले आहेत.

दिघाशी विभागातील दिंडीत अनेक वारकरी सहभागी झाले असून, यात तरुण मोठ्या प्रमाणात आहेत. मोखाड्यातील सूर्यमाळ-आमला आणि तोरंगण घाटातून दिंड्या मार्गक्रमण करीत आहेत. घाटातील रस्त्यात, ठिकठिकाणी रिंगण आणि माऊलीचा गजर करत वारकरी तल्लीन होत आहेत. त्यामुळे माऊलीच्या गजराने, मोखाड्यातील डोंगरदऱ्या दुमदुमल्या आहेत.

devotees go to Trimbakeshwar.
Sant Nivruttinath Palkhi : दीड महिन्यांनंतरही वारकऱ्यांचा उत्साह कायम! निवृत्तीनाथांच्या दिंडीचे चिंचोलीत आगमन

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पायी दिंड्या घेऊन येतात. हीच परंपरा पालघर, ठाणे जिल्ह्यातील आणि गुजरात हद्दीतील वारकऱ्यांनी जपली आहे. पालघर, वाडा, भिवंडी, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि गुजरात हद्दीतील वारकरी पायी दिंड्या घेऊन त्र्यंबकेश्वरला निघाले आहेत.

पायी तर काही दिंड्या खोडाळा आणि मोखाडा येथे मुक्कामी राहून मार्गस्थ झाल्या आहेत. दिंडीतील वारकरी घाटातील रस्त्यांमध्ये टाळ, मृदंगाच्या तालावर तल्लीन होऊन माऊलीचा गजर करत आहेत. कुठे रिंगण करून महिला फुगड्या खेळत आहेत. त्यामुळे मोखाड्यातील तोरंगण आणि सूर्यमाळ आमला घाटात वातावरण भक्तिमय झाले आहे.

सकाळी काकड आरतीपासून रात्री मुक्कामी कीर्तन करत दिवस-रात्र नामस्मरण करून दिंड्या मंगळवार (ता. ६) पर्यंत त्र्यंबकेश्वरला दाखल होतील. या वर्षी तरुण-तरुणींचा दिंडीमध्ये वाढता सहभाग भारतीय संस्कृती जोपासण्याचा चांगला संकेत आहे. तरुण वर्ग भक्तिमार्गाला लागल्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून व्यसनापासून परावृत्त होतील, असे वारकऱ्यांनी सांगितले.

devotees go to Trimbakeshwar.
Sant Nivruttinath Yatrotsav : टाळ- मृदंग अन माउलींच्या नामस्मरणात; जिल्ह्यातील पालख्या विसावल्या गोदातीरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com