Devendra Fadnavis Nashik Daura : पोलिसांनी शासक नव्हे, जनतेचे सेवक व्हावे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलिसांनी शासक म्हणून नव्हे, तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. १०) येथे केले.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse, Rural Development Minister Girish Mahajan along with the team of the State Reserve Police Force who won the overall title in the ongoing state level police sports competition here.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse, Rural Development Minister Girish Mahajan along with the team of the State Reserve Police Force who won the overall title in the ongoing state level police sports competition here.esakal

Devendra Fadnavis Nashik Daura : पोलिस दलात भरती होताना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नव्हे, तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. १०) येथे केले.

महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सुरू असलेल्या ३४ व्या ‘महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा- २०२४’च्या समारोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis statement on Police should be servants of people and not rulers nashik news)

ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, आमदार ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलिस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते. अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांनी प्रास्ताविक केले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse, Rural Development Minister Girish Mahajan along with the team of the State Reserve Police Force who won the overall title in the ongoing state level police sports competition here.
Devendra Fadanvis Nashik Daura: फडणवीस यांच्या दौऱ्यामध्ये कपात

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ताणतणावापासून दूर राहण्यासाठी खेळ महत्त्वपूर्ण आहेत. खेळामुळे एकसंघ भावना तयार होऊन आव्हाने पेलण्याची स्फूर्ती व शक्ती मिळत असल्याने खेळाडू प्रत्येक क्षेत्रात आपली चमक दाखवत असतो. यासारख्या क्रीडा स्पर्धांमुळे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. स्पर्धांतून पोलिस दल एक नवा जोश व उत्साह घेऊन जाईल.

पोलिसांच्या कल्याणासाठी चांगली दर्जेदार घरे उपलब्ध करून देणे, कुटुंबीयांना आरोग्य, शिक्षणाच्या योजना देण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाल्या, की क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत होत असते. वेळोवेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पोलिस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माहिती दिली.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या पोलिस पथकांच्या संचलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३४ व्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा समारोप झाल्याचे जाहीर केले. तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी मानले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse, Rural Development Minister Girish Mahajan along with the team of the State Reserve Police Force who won the overall title in the ongoing state level police sports competition here.
Devendra Fadanvis Nashik Daura : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या विविध कार्यक्रम

या अधिकाऱ्यांचाही झाला सन्मान

जागतिक पोलिस आणि फायर गेम, विनिपेग, कॅनडा येथील पोलिस संघाचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या पदकप्राप्त खालील पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान झाला. कुस्ती क्रीडाप्रकारात सुवर्णपदक विजेते सहाय्यक पोलिस आयुक्त नरसिंग यादव, सहाय्यक समादेशक राहुल आवरे, पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, बॉडीबिल्डिंगमध्ये रौप्य व कांस्यपदक विजेते सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी, पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे.

राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेतील विजेते असे ः

- हॉकी विजेता संघ : प्रशिक्षण संचालनालय

- फुटबॉल विजेता संघ : राज्य राखीव पोलिस बल

- महिला संघ : ऑल ओव्हर जनरल चँपियनशिप : वीर जिजामाता शिल्ड- प्रशिक्षण संचालनालय संघ पहिल्या रँकवर, तर मुंबई शहर (द्वितीय), पुणे आणि पिंपरी चिंचवड (तृतीय), कोल्हापूर रेंज (चौथा), नागपूर शहर (पाचव्या), अमरावती रेंज (सहाव्या)

व्हॉलीबॉल : नागपूर शहर, कबड्डी : पुणे शहर/ पिंप्री चिंचवड आयुक्तालय

पुरुष संघ : कबड्डी : मुंबई शहर, बास्केटबॉल : नाशिक परिक्षेत्र, खो-खो व हँडबॉल : मुंबई शहर, ॲथलेटिक्स : प्रशिक्षण संचालनालय,

उत्कृष्ट नेमबाज (पुरुष) : वाशीम पोलिस अधीक्षक अनुज तारे

ऑल ओव्हर जनरल चँपियनशिप : राज्य राखीव पोलिस बल (प्रथम), प्रशिक्षण संचालनालय संघ (द्वितीय), मुंबई शहर (तृतीय), कोल्हापूर रेंज (चौथ्या), पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड (पाचव्या) तर नाशिक रेंज (सहाव्या).

Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse, Rural Development Minister Girish Mahajan along with the team of the State Reserve Police Force who won the overall title in the ongoing state level police sports competition here.
Devendra Fadnavis Nashik Daura : पंचवटीतील नाट्यगृहाचे आज उद्घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com