esakal | नाशिकसाठी 50 इलेक्ट्रीक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

नाशिकसाठी 50 इलेक्ट्रीक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - फडणवीस

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : जगात राहण्यायोग्य शहरांमध्ये सांडपाणी व्यवस्था, कचयाची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट, रस्ते, आरोग्य, पाणी या सुविधांबरोबरचं सार्वजनिक वाहतुक व्यवस्था देखील प्राधान्याने विचार होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या बिकट परिस्थिती मध्ये नाशिक महापालिकेने शहर बससेवा सुरु करून आधुनिकतेकडे दमदार पाऊल टाकले आहे. भविष्यातील टायरबेस मेट्रो व शहर बसवाहतुक विकासाच्या दृष्टीने मॉडेल ठरेल असा विश्‍वास व्यक्त करताना आधुनिक नाशिक उभारणीसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (devendra fadnavis assures that he will follow up with the central government to get 50 electric buses for nashik)

फडणवीस म्हणाले, वाढत्या शहरांमध्ये मध्यमवर्गियांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. नागरिकरणामुळे खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. त्यातून प्रदुषणाच्या समस्या वाढतं आहे. प्रदुषणाच्या परिणामांचा विचार करता आरोग्याच्या दृष्टीने घातकं आहे. त्यामुळे राहण्यायोग्य शहरांमध्ये जसा सांडपाणी, कचरा विल्हेवाट या घटकांचा विचार होतो तसा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेलाही महत्व प्राप्त झाले आहे. त्याअनुशंगाने नाशिक महापालिकेने सुरु केलेली शहर बससेवा शहर विकासाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनी वरुन शहर बससेवेच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी आभार मानताना भाजपने निवडणुकी दिलेले आश्‍वासन पुर्ण केल्याचे सांगितले. प्रारंभी ऑनलाईन कोनशिला अनावरण, सिटी लिंक लोगो व मोबाईल ॲप्लिकेशन अनावरण, वेबसाईट उदघाटन करण्यात आले. सिटी लिंग लोगो तयार करणारे स्मितेश चव्हाणके व बससेवेसाठी पाठपुरावा करणाया नगरसेविका वर्षा भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. कालिदास कलामंदीरच्या बाहेर बससेवेला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.


नाशिक महापालिकेच्या वतीने नव्याने सुरु झालेल्या शहर बससेवेच्या उदघाटन सोहळा कालिदास कलामंदीर मध्ये पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर सतीश कुलकर्णी, माजी मंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल, आयुक्त कैलास जाधव, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सिमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, स्थायी समिती सभापती गणेश गिते, उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेते कमलेश बोडके, भाजप गटनेते अरुण पवार, शिवसेना गटनेते विलास शिंदे, मनसे गटनेते नंदीनी बोडके, दिक्षा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

निओ मेट्रोचे ग्लोबल मॉडेल

महाराष्ट्रात शहरीकरण झपाट्याने वाढतं असल्याने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करणे गरजेचे आहे. म्हणूनचं टु टिअर शहरांमध्ये रुळावरील मेट्रो एवजी टायरबेस मेट्रो हि नवीन संकल्पना आणली. निओ मेट्रोचा प्रकल्प प्रथम नाशिक मध्ये साकारण्याचे निश्‍चित केले. केंद्र व राज्य सरकारने निधी देवू केला आहे. येत्या काही दिवसात प्रकल्पाची कामे सुरु होतील. नाशिक निओ मेट्रोचे मॉडेल देशाने स्विकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात देखील सर्वेक्षणाच्या सुचना दिल्या आहेत. भविष्यात देशातील आठ शहरांमध्ये टायरबेस मेट्रो साकारली जाणार आहे. त्यामुळे नाशिक निओ मेट्रो मॉडेल ग्लोबल स्वरुप धारण करतं असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात नागरिकरणाचा वाढता वेग लक्षात घेता भाजपच्या सत्ता काळात नगरपालिकांपासून ते महापालिकांप्रयंत कचरा विल्हेवाट करण्यासाठी निधी दिला. त्यामुळे देशात स्वच्छतेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

हेही वाचा: पावसासाठी वेधशाळा, तज्ज्ञांच्या अंदाजाकडे बळीराजाच्या नजरा

फडणवीस म्हणाले…

- बससेवेचे अवलंबित्व वाढवून अधिकाधिक सुविधा द्याव्या.
- प्रवाशांना ३०० मीटर पर्यंतच्या क्षेत्रात बससेवा द्यावी.
- केंद्राकडून ५० ईलेक्ट्रीक बस मिळविण्यासाठी प्रयत्न.
- भविष्यात सीएनजी, ईथेनॉल बसेस संख्या वाढवावी.
- प्रदुषणकारी डिझेल बस पुर्णपणे बंद करावी.
- भविष्यात टायरबेस मेट्रो व शहर बससेव एकमेकांना जोडावी.
- पर्यटन वाढीच्या दृष्टीने नाशिकचा विकास व्हावा.
- बससेवा देताना नवीन संकल्पना हव्यात.
- शेवटच्या थांब्यापर्यंत प्रवाशांना सुविधा मिळावी.

(devendra fadnavis assures that he will follow up with the central government to get 50 electric buses for nashik)

हेही वाचा: नाशिकला 59 वर्षांनी केंद्रामध्ये पहिल्यांदा मिळाले मंत्रिपद

loading image