Leopard
sakal
देवगाव/लासलगाव: येथे काही दिवसांपासून दहशत माजविणारा बिबट्या अखेर बुधवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास वन विभागाने शरद जोशी यांच्या शेतातील पिंजऱ्यात जेरबंद केला. अंदाजे पाच वर्षांचा हा नर बिबट्या असल्याची माहिती रेस्क्यू टीमने दिली. मात्र, ‘या बिबट्याला जिवंत पकडून घेऊन जाण्याऐवजी जागेवरच ठार करावे’ या मागणीसाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी चार तास ‘रास्ता रोको’ करीत आंदोलन छेडले होते. अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता बिबट्या ठार करण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्यावर आंदोलक शांत झाले.