''मंदिराचे दार तरी उघडा...अन्यथा गाव तरी दत्तक घ्या''...सप्तश्रृंगी देवी संस्थानाची आर्त विनवणी

vani2.png
vani2.png
Updated on

नाशिक / वणी : चार महिने उलटूनही आदिमाया सप्तशृंगी मंदिराचे दार भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने आणि पर्यायाने गडावरील सर्व अर्थचक्र बंद झाल्यामूळे गडावरील व्यावसायिक व ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने किंवा देवस्थान संस्थानने गाव दत्तक घ्यावे अथवा मंदिर किंवा पहिली पायरीवर भाविकांना दर्शनासाठी परवानगी द्यावी अशी आर्त विनवणी सप्तशृंगी गडावरील व्यापारी वर्गाने निवेदनाद्वारे केली आहे.

व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचा निर्णय पहिल्या लॉकडाऊन दरम्यान केंद्र व राज्यशासनाने घेतला होता. त्यात गडावरील चैत्रोत्सव यात्राही रद्द झाल्याने गडावरील व परीसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान केंद्रशासनाने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनेक गोष्टी शिथील केल्या यात रेड झोन आणि कंन्टेनमेंट झोन सोडून अन्य भागातील सर्व धार्मिक स्थळे आणि मंदिरे 8 जूननंतर सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांबरोबरच पर्यटन व धार्मिक स्थळांवर अवलंबून असलेल्या उद्योग धंदे बंदच आहे. 

शासनाने दत्तक घ्यावे अशी मागणी

गडावरील संपूर्ण अर्थचक्र हे भाविक व पर्यटकांवर अवलंबून असल्यामूळे लॉकडाऊनमुळे गडावरील सर्वांचीच आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून व्यापारी वर्गावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला आहे. गडावर अन्य कुठलाही शेती व्यवसाय नसल्याने हातावर पोट असलेल्यांची व व्यावसायिकांची चिंता वाढल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मंदिर बंद असल्याने स्थानिक दोनशे ते तीनशे तरुणांनी कामानिमित्त स्थलांतर केले आहे. त्यामुळे मंदिर खुले करण्यात यावे अन्यथा पहिली पायरी येथे भगवतीची प्रतिमा स्थापित करून दर्शन सुरू करण्यात यावे नाहीतर गावचे संस्थान किंवा शासनाने दत्तक घ्यावे अशी मागणी मंगळवारी (ता. २१) ग्रामस्थ व व्यावसायिकांनी आयोजित केलेल्या बैठकीत केली आहे. याबाबतचे निवेदन देवी संस्थानचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर व जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांना देण्यात आले आहे. 

नाशिक, मुंबई, पुणे यासारखी मोठे शहर अनलॉक करुन सर्वच उद्योग व्यवसाय सुरु झालेत.  मात्र सप्तशृंगगड तीर्थक्षेत्रा कडे प्रशासनाने लक्ष द्यावे तसेच देवी संस्थानने मंदिर खुले करण्यासाठी देवी संस्थानने पाठपुरावा करावा. - अजय दुबे, अध्यक्ष, व्यापारी संघटना

गावातील सर्व दुकाने व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाल्याने गावाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाल्याची स्थिती आहे. मंदिर खुले करावे, अन्यथा संस्थानने गाव दत्तक घ्यावे.
- राजेश गवळी, उपसरपंच

कोरोनामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सप्तशृंगी गडावरील दुकाने उघडलेली नाही. पालकमंत्री व तहसीलदार यांनी भाविकांना सप्तशृंगी गडावर प्रवेश देवून शासनाच्या नियमाप्रमाणे सकाळी ९ ते ५ या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. - संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ते

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com