Utpatti Ekadashi : उत्पत्ती एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वर वारकऱ्यांची मांदियाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trimbakeshwar

Utpatti Ekadashi : उत्पत्ती एकादशी निमित्त त्र्यंबकेश्वर वारकऱ्यांची मांदियाळी

त्र्यंबकेश्वर : कार्तिक कृष्ण एकादशी म्हणजेच उत्पत्ती एकादशी निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी अन् भाविकांच्या दिवसभर रांगा लागलेल्या होत्या. रविवारी (ता. २०) पहाटे पासुनच भाविक कडाक्याच्या थंडीत कुशावर्त तीर्थावर स्नान करुन निवृत्तीनाथ समाधी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करीत होते.

हेही वाचा: Utpanna Akadashi: आज उत्पत्ती एकादशी! या दिवशी हे व्रत ठेवल्याने मिळते सुख शांती; जाणून घ्या विधी

उत्पत्ती एकादशी ही महिन्याची वारी असल्याने कुटुंबातील एक तरी व्यक्तीने येथे हजेरी लावण्याचा म्हणजे वारीसाठी जाण्याचा प्रघात असुन वारकरी भक्त यात खंड पडू देत नाही.

त्यामुळे आज सर्व मंदिरात दर्शनासाठी तोबा गर्दी दिसत होती. येथील समाधी मंदिराच्या आवारात बांधकामे सुरु असुन अकरा कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची विविध कामे होणार आहेत.

हेही वाचा: Astro Tips : नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे?

वारकरी भाविक देखील या मंदिराच्या ट्रस्ट ला मोठ्या देणग्या देतात. यात अगदी गरीब वारकरी देखील आपली अल्प का होईना देणगी देऊन समाधान पावतो. आळंदीला आज यात्रा असल्याने तेथे जाता न आल्याने ज्ञानदेवांच्या गुरु व जेष्ठ बंधु निवृत्तीनाथ यांच्या समाधी चरणी लीन होण्यासाठी वारकरी हजेरी लावतात.