Utpanna Akadashi: आज उत्पत्ती एकादशी! या दिवशी हे व्रत ठेवल्याने मिळते सुख शांती; जाणून घ्या विधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Utpanna Akadashi

Utpanna Akadashi: आज उत्पत्ती एकादशी! या दिवशी हे व्रत ठेवल्याने मिळते सुख शांती; जाणून घ्या विधी

Utpanna Akadashi: मार्गशीष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी व्रत ठेवल्याने तुमच्या जीवन सुख आणि शांती प्राप्त होते. तसेच मृत्यूनंतर विष्णु लोक प्राप्त होतं अशीही मान्यता आहे. या वर्षी उत्पत्ती एकादशी २० नोव्हेंबरला म्हणजेच आज आहे. या दिवशी व्रत आणि भगवद भजन, किर्तन करण्यास विशेष महत्व आहे.

उत्पत्ती एकादशीची कथा

असे मानले जाते की सतियुगात मुर नावाच्या राक्षसाने इंद्रदेवावर विजय मिळवत त्यांच्या पदापासून त्यांना हटवले. तेव्हा सगळी देवता मंडळी महादेवांजवळ पोहोचली, तेव्हा त्यांना धनुष काढत कित्येक दानवांचा वध केला. मात्र ते मुर दानवाला मारण्यात अपयशी ठरले. त्याला अनेक देवांचे वरदान प्राप्त होते.

हेही वाचा: Vivah Panchami: याच दिवशी झाला होता राम सितेचा विवाह मात्र या दिवशी लोक लग्न का करत नाहीत? कारण...

असा झाला मुरचा वध

जेव्हा विष्णु मुराचा पराभव करू शकले नाही तेव्हा ते युद्ध सोडून बद्रिकाश्रमच्या गुफेत जाऊन विश्राम करू लागले. मुर राक्षसाला हे कळताच त्यांचा वध करण्यास तो पोहोचला. याच काळात विष्णूंच्या शरीरातून एक कन्या उत्पन्न झाली. जिने मुराचा संहार केला. यावर प्रसन्न होऊन विष्णूंनी वरदान दिलं की तुझी आराधना करणारा प्रत्येक प्राणी तथा मानव काय सुखी राहील. तसेच मृत्यूनंतर त्या व्यक्तीस विष्णू लोक प्राप्त होईल.

हेही वाचा: Tulsi Vivah in ISKCON : इस्‍कॉन मंदिरात तुळशी शाळिग्राम विवाहाचा जल्‍लोष

वर्षाच्या २४ एकादशीपैकी उत्पन्ना एकादशीला विशेष महत्व आहे. विष्णूंच्या शरीरातूनन उत्पन्न झाल्या कारणाने या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे नाव पडले.

टॅग्स :peacedevotees