Summer Heat : पारा वाढताच दिवसभर जाणवतात उन्‍हाच्‍या झळा

summer heat
summer heatesakal

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातून गारवा गायब झालेला असून, पारा सातत्‍याने वाढतो आहे.

त्यामुळे दिवसाच्‍या वेळी उन्‍हाच्‍या झळा जाणवू लागल्‍या आहेत. ( dew has disappeared from atmosphere mercury is rising continuously heat of sun started to be felt during day nashik news)

बुधवारी (ता. २२) नाशिकचे कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. तर किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे.

फेब्रुवारी महिन्‍याच्‍या सुरवातीस वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. परंतु आता महिना संपत असताना थंडी पूर्णपणे गायब झालेली आहे. मध्यरात्रीनंतर काही प्रमाणात थंड वाऱ्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

summer heat
Jindal Fire Case : जिंदालमधील अग्निकांडप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

असे असले तरी सकाळी नऊपासून उन्‍हाच्‍या तीव्र झळा जाणवू लागल्‍या आहेत. दुपारी बारा ते दोन, या वेळेत सूर्यकिरणांची तीव्रता अधिक असल्‍याने सर्वसामान्‍यांना बचावासाठी विविध उपाययोजना कराव्‍या लागत आहेत.

उपरणे, टोपीसह अन्‍य वस्‍तूंचा आधार घेताना नाशिककरांकडून उन्‍हाच्‍या झळांपासून बचाव केला जातो आहे. बुधवारी नाशिकचे कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, येत्‍या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. किमान तापमान १२.६ अंश नोंदविले गेले आहे.

summer heat
Nashik News: नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रवास ‘खडतर’! MAHARAILकडून तूर्तास मूल्यांकन न करण्याच्या सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com