Dharmendra
sakal
मालेगाव: सिनेअभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांचा मालेगाव व टोकडे येथील भेटीला उजाळा मिळाला आहे. ७ नोव्हेंबर १९८४ ला अभिनेते धर्मेंद्र येथे आले होते. त्यांचे मालेगाव व टोकडे येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. टोकडे येथील जाट समाजबांधवांनी धर्मेंद्र यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती.