He-Man Dharmendra
sakal
हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांचे नाशिकशी नेहमीच आस्थेचे ऋणानुबंध राहिले आहेत. ‘प्रतिज्ञा’, ‘मेरा गाव मेरा देश’ या चित्रपटांपासून नाशिकशी जुळलेले रेशीमबंध हे धर्मेंद्र यांनी हळुवार मनाच्या कप्प्यात साठवून ठेवले होते. त्यांच्या निधनानंतर या संबंधांना वेगवेगळ्या माध्यमातून उजाळा देण्यात आला. टोकडे (ता. मालेगाव) येथील त्यांचे येणे, बैलगाडीतील मिरवणुकीबरोबरच शूटिंगच्या दरम्यान थांबत त्यांनी नाशिकच्या विविध खाद्यपदार्थांचा घेतलेला आस्वाद आदी सर्व घटनांच्या आठवणी नाशिककरांच्या स्मृतीपटलावर जाग्या झाल्या.