Dam
sakal
धुळे: जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. धरणांतील उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्क्यांवर आला आहे. धुळे पाटबंधारे विभागाच्या चार मार्चच्या अहवालानुसार मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ६०.८६ टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशीच्या तुलनेत यंदाची स्थिती समाधानकारक असली, तरी एप्रिल-मे महिन्यात पाण्याची मागणी वाढणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.