Fuel Scam
sakal
नाशिक: ‘बाउझर’च्या माध्यमातून घरपोच डिझेल पुरवठा करताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नाशिक पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आला होता. तसेच, दिंडोरी तालुक्यातील पेट्रोलपंपचालकांनी याबाबतचे व्हिडिओ सादर करीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला होता. याची गंभीर दखल ‘पेट्रोलियम अॅन्ड एक्स्प्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’ (पेसो) या विभागाने घेतली आहे.