म्युकरमायकोसिस बाधितांच्या आकडेवारीत तफावत

mucormycosis
mucormycosisesakal

नाशिक : कोरोनाबाधितांची (corona virus) संख्या कमी होताना म्युकरमायकोसिस (mucormycosis) बाधितांची संख्या मात्र वाढत आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून म्युकरमायकोसिस बाधित रुग्णांची उपलब्ध आकडेवारी आणि जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या बाधितांच्या आकडेवारीत तफावत असून, रुग्णांसाठी संबंधित इंजेक्शनचा तुटवडा (injections supply shortage) असल्याचे पुढे आले आहे.

खासगी रुग्णालयांतील ९८ रुग्णांबाबत आरोग्य विभागाच अनभिज्ञ

सरकारी व खासगी रुग्णालयांतील रुग्णांची एकत्रित आकडेवारी करून त्या प्रमाणात इंजेक्शनची मागणी नोंदविली जात नसल्याने बुधवारी (ता. १९) खासदार हेमंत गोडसे यांनी हा विषय अन्न औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार वाढीव म्युकरमायकोसिस इंजेक्शनची मागणी केली. रुग्णसंख्येच्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा तातडीने वाढविण्यात यावा, अशी मागणी खासदार गोडसे यांनी केली. त्यांनी बुधवारी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दा. रा. गहाणे यांची भेट घेतली. त्या वेळी इंजेक्शनचा साठा वाढविण्याची मागणी केली.

म्युकरमायकोसिस आजाराने बाधितांची संख्याही वाढतेय

उत्तर महाराष्ट्रात आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या काहीअंशी कमी होताना दिसत आहे. पण त्याचवेळी म्युकरमायकोसिस आजाराने बाधितांची संख्याही वाढत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णसंख्या अधिक आहे. खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मिळणारी आकडेवारी आणि प्रत्यक्षात विविध खासगी रुग्णालयांतील उपचार घेत असलेल्या रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता यात मोठी तफावत आहे. जिल्हा प्रशासनाकडून फक्त सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची आकडेवारी शासनाला दिली जाते. त्यामुळे शासनाकडून मर्यादित इंजेक्शनचा पुरवठा होतो. प्रशासनाने खासगी रुग्णालयांतील म्युकरमायकोसिस रुग्णांची माहिती दिली, तरच या इंजेक्शनचा साठा वाढवून मिळणार आहे.

mucormycosis
रेमडेसिव्हिर पुरविणाऱ्या एका समूहाचा वापर थांबविला

आकडेवारीत तफावत

म्युकरमायकोसिसने बाधितांसाठी इंजेक्शन एमफोटेरसिन-बीचा पुरवठा अत्यल्प असल्याने रुग्णांच्या नातेवाईक आणि काही डॉक्टरांच्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाकडून केवळ म्युकरमायकोसिसचे ३९ रुग्ण असल्याची माहिती विभागाला देण्यात आली आहे. मात्र खासगी रुग्णालयांत ९८ रुग्ण उपचार घेत आहेत, त्याची माहिती कळविण्यात न आल्यामुळे मंगळवारी झालेला एमफोटेरसिनचा साठा अत्यल्प होता. खासदार गोडसे यांनी औषध प्रशासनाचे सहआयुक्त दा. रा. गहाणे यांची भेट घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णांची मिळणारी आकडेवारी आणि प्रत्यक्षात असलेल्या रुग्णांची संख्या यात मोठी तफावत असल्याचे गहाणे यांच्या लक्षात आणून देत एमफोटेरसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा तातडीने वाढविण्याची मागणी केली.

mucormycosis
लसीकरणातील राजकीय चमकोगिरीवर मनसेचा आक्षेप!

म्युकरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत होणारा एमफोटेरसिन-बी इंजेक्शनचा कोटा कमी असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या लक्षात आणून देत, म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी इंजेक्शनचा कोटा वाढविण्याची मागणी केली आहे. त्यानुसार वाढीव इंजेक्शन देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. - हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com