लसीकरणातील राजकीय चमकोगिरीवर मनसेचा आक्षेप; ओळखीच्या लोकांना सहज मिळतेय लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns vaccination

लसीकरणातील राजकीय चमकोगिरीवर मनसेचा आक्षेप!

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहराच्या विविध भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम (corona vaccination drive) सध्या सुरू आहे. परंतु या लसीकरणाचा राजकीय लाभ उठविला जात असल्याचा आरोप नाशिक मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. (maharashtra navnirman sena)

ओळखीच्या लोकांना लस मिळवण्यासाठी चमकोगिरी

कोरोना दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोना योद्धा म्हणून कर्मचारी काम करत असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. परंतु काही राजकीय नेते व त्यांचे पाठीराखे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपल्या ओळखीच्या लोकांना लस मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर दबाव आणत आहे. यामुळेदेखील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे. आरोग्य यंत्रणेने कुठल्याही हस्तक्षेपाला न जुमानता कर्तव्य बजवावे व लसीकरण आतील राजकीय हस्तक्षेप थांबवावा, असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: ...त्या दिवशी अग्निशामक विभागात खणाणले सुमारे 63 कॉल!

राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवा; मनसेची मागणी

प्रशासनाने जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाकरिता आपले कर्तव्य बजावावे. योग्य ती उपाययोजना करून लसीकरण आतील राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेशहराध्यक्ष अंकुश पवार यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: तौक्ते चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीतील मृतांच्या वारसांना मदत

loading image
go to top