

The former Zilla Parishad school student has become an inspiration for rural and tribal students across Maharashtra.
Sakal
सुरगाणा : अतिदुर्गम तोरणडोंगरी गावातील रहिवासी वडील महादू गावित व आई मोहनाबाई गावित या सर्वसामान्य आदिवासी शेतमजूर दांपत्याच्या पोटी जन्म घेतलेला दिलीप २००९ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणडोंगरी या शाळेमध्ये पहिल्या इयत्तेत दाखल झाला. अभ्यासात जेमतेम असला तरी अंगी कौशल्य,काटकपणा,चपळता असल्याने झाडांवर चढणे, गुरांच्या मागे जंगलात जाणे आदी कामे तो अधिकच चपळाईने करीत होता.